Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा

कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा

Ratan Tata : रतन टाटा यांच्या आयुष्यातील एक असा किस्सा, जेव्हा ते आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाटी स्वतः विमान उडवायलाही तयार झाले होते. महत्वाचे म्हणजे हा किस्सा पुण्यातला आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:29 AM2024-10-10T10:29:48+5:302024-10-10T10:31:26+5:30

Ratan Tata : रतन टाटा यांच्या आयुष्यातील एक असा किस्सा, जेव्हा ते आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाटी स्वतः विमान उडवायलाही तयार झाले होते. महत्वाचे म्हणजे हा किस्सा पुण्यातला आहे...

Ratan Tata was ready to fly the plane to save the employee's life, what really happened The story is from Pune | कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा

कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा

देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते 1991 सालापासून ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे चेअरमन होते. ते केवळ एक चांगले उद्योगपतीच नव्हे, तर, एक चांगले व्यक्तीही होते. ते आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मच्यांवरही अत्यंत प्रेम करायचे. आज आम्ही आपल्याला त्यांच्या आयुष्यातील एक असा किस्सा सांगणार ओहोत,  जेव्हा ते आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाटी स्वतः विमान उडवायलाही तयार झाले होते. महत्वाचे म्हणजे हा किस्सा पुण्यातला आहे...

नेमकं काय घडलं होतं? -
ही घटना आहे ऑगस्ट 2004 ची. पुण्यातील टाटा मोटर्सचे एमडी प्रकाश एम तेलंग यांची प्रकृती अचानक खालावली आणि डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. तो दिवस होता रविवारचा. यामुळे डॉक्टरांना एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणे शक्य होत नव्हते. यासंदर्भात जेव्हा रतन टाटा यांना समजले, तेव्हा ते कंपनीचे विमान उडववायला तयार झाले. रतन टाटा यांच्याकडे पायलटचे लयसन्स होते. मात्र, एवढ्यात एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली आणि प्रकाश यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे त्याच्यावर यशस्वी उपचार झाले. ते जवळपास 50 वर्षं टाटा मोटर्समध्येच कार्यरत होते आणि 2012 मध्ये निवृत्त झाले.

ट्रेंड पायलट -
रतन टाटा हे एक प्रशिक्षित पायलट होते. त्यांच्याकडे विमाने उडवण्याचा परवाना होता. त्याच्याकडे Dassault Falcon 2000 प्रायव्हेट जेटही होते, ज्याची किंमत सुमारे 150 कोटी रुपये एवढी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते एका फायटर प्लेनच्या कॉकपिटमध्ये दिसले होते. हा फोटो 2011 चा आहे, तेव्हा त्यांनी बेंगळुरू एअरशोमध्ये बोईंगच्या F-18 सुपर हॉर्नेट विमानातून उड्डाण केले होते. 28 फेब्रुवारी 2019 रोजी त्याच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त त्यानी हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होता.
 

Web Title: Ratan Tata was ready to fly the plane to save the employee's life, what really happened The story is from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.