Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBIनं किसान क्रेडिट कार्डावर दिली मोठी सूट; शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट

RBIनं किसान क्रेडिट कार्डावर दिली मोठी सूट; शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावर 2 टक्क्यांची व्याजदराच्या स्वरूपात सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 05:40 PM2019-08-27T17:40:41+5:302019-08-27T17:44:47+5:30

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावर 2 टक्क्यांची व्याजदराच्या स्वरूपात सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.

rbi announces modalities for 2 percent interest subvention for fisheries farmers | RBIनं किसान क्रेडिट कार्डावर दिली मोठी सूट; शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट

RBIनं किसान क्रेडिट कार्डावर दिली मोठी सूट; शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँके(RBI)नं मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावर 2 टक्क्यांची व्याजदराच्या स्वरूपात सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. व्याज अनुदाना(Interest Subvention)बरोबरच छोट्या कालावधीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या अशा शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदरावर सबसिडी मिळणार आहे. 2018-19 आणि 2019-20मध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. मोदी सरकारनं फक्त पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डाची सुविधा दिली आहे.  

वेळेत कर्ज चुकवणाऱ्यांना 3 टक्के सूट
तसेच वेळेवर कर्ज चुकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजावर 3 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. हे नियम लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना वर्षं 2018-19 आणि 2019-20 घेतलेल्या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज द्यावं लागणार आहे. 



मत्स्यपालन-पशुपालन करणाऱ्यांना होणार फायदा
आरबीआयनं या व्याज सबसिडीच्या सवलतीचा फायदा 2 लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या सवलतीचा फायदा मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. जे शेतकरी केसीसी पीक कर्ज (Crop Loan) घेत आहेत आणि मत्स्यपालन आणि पशुपालनसारखे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत, त्यांना याचा फायदा होणार आहे. पीक कर्ज (Crop Loan) आणि मत्स्यपालन-पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर या योजनेंतर्गत फायदा होणार आहे.

Web Title: rbi announces modalities for 2 percent interest subvention for fisheries farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी