मुंबई: कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम असून, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे अर्थचक्र मंदावले आहे. त्यातच महागाईचा दर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले आहेत. RBI ने रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. (rbi decides to keeps repo rate unchanged at 4 percent)
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आढावा बैठक झाल्यानंतर शुक्रवारी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. अर्थव्यवस्था सावरत असली तरी महागाई धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे तूर्त पतधोरण समितीतील सर्वच सदस्यांनी एकमताने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दास यांनी सांगितले.
Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया
आपण सतर्क राहणे गरजेचे
देशातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामधून अर्थव्यवस्था सावरत नाही तोपर्यंत व्यादर कायम ठेवण्याचा निर्णय द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेमधील मागणी आणि पुरवठा हा समतोल कायम राखण्याची गरज असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.
“मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त, युपी आणि बिहारसाठी लवकरच आणखी २ स्पेशल ट्रेन”
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बसलेल्या आर्थिक फटक्यातून अर्थव्यवस्था सावरत असून, लसीकरणानंतर त्याला अजून चालना मिळेल. चांगला पाऊस आणि आर्थिक व्यवहारांसंदर्भातील सकारात्मक संकेत हे अर्थव्यवस्थाला चालना देतील. सलग सातव्यांना व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, भारताचा आर्थिक विकासदर २०२१-२२ च्या आर्थिक वर्षामध्ये ९.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.