Lokmat Money > बिझनेस न्यूज > किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?

किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?

Inflation, RBI and Repo rate: गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई निर्देशांकात मोठी वाढ, अमेरिकेने नवीन सरकार येण्याची चाहूल लागताच व्याजदर कमी केला आहे. यामुळे भारतातही आरबीआय व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:15 PM2024-11-12T18:15:18+5:302024-11-12T18:16:23+5:30

Inflation, RBI and Repo rate: गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई निर्देशांकात मोठी वाढ, अमेरिकेने नवीन सरकार येण्याची चाहूल लागताच व्याजदर कमी केला आहे. यामुळे भारतातही आरबीआय व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

Retail inflation out of RBI's hands, rich to 6.21%; A reduction in repo rate is not possible? | किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?

किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?

अमेरिकेने नवीन सरकार येण्याची चाहूल लागताच व्याजदर कमी केला आहे. यामुळे भारतातही आरबीआय व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतू, ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ महागाई दराचा आकडा आला असून आता व्याज दर कपातीची शक्यता धुसर बनली आहे. 

महागाई आता आरबीआयच्या हाताबाहेर गेली आहे. ग्राहक मुल्य निर्देशांकावर आधारित महागाईने ऑक्टोबरमध्ये 6.21 टक्क्यांची पातळी गाठली आहे. सप्टेंबरमध्ये हाच महागाई दर 5.49% होता. यात ०.७२ टक्क्याची वाढ झाली आहे. अशाप्रकारे ही महागाई आरबीआयच्या सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर गेली आहे. 

केंद्र सरकारने आरबीआयवर ही किरकोळ महागाई चार टक्क्यांपर्यंत आणण्याची जबाबदारी दिली होती. परंतू तसे करण्यात आरबीआय अपयशी ठरली आहे. गेल्याच महिन्यात आरबीआयने रेपो रेच ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. अमेरिकेमुळे हा दार कमी करेल अशी अपेक्षा होती, परंतू महागाई दर पाहता रेपो रेट कमी होण्याची शक्यता उरलेली नाही. 

ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई वाढून 10.87 टक्क्यांवर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये ती 9.24 टक्के होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही महागाई 6.61 टक्क्यांवर होती. तर किरकोळ महागाई याच महिन्यात गेल्या वर्षी  4.87 टक्क्यांवर होती. यामुळे या दिवाळीच्या महिन्यात महागाई कोणत्या पातळीवर गेली आहे याचा अंदाज येतो. 

कांदा आणि युद्ध आणखी भडकवणार...

या महागाईमध्ये येत्या काळात कांदा चांगलीच फोडणी देणार आहे. पुण्यात अनेक ठिकाणी जुना कांदा ८० रुपये तर नवा कांदा ६०-७० रुपयांना किलो विकला जात आहे. दिल्लीत कांद्याचा दर ८० रुपयांवर गेला आहे. यामुळे येत्या काळात कांद्याचा दर ग्राहकांना चांगलाच रडवणार आहे. यातच इराण इस्रायलवर हल्ल्याची तयारी करत आहे. जर युद्ध भडकले तर कच्च्या तेलाचे दरही भडकणार आहेत. 

Web Title: Retail inflation out of RBI's hands, rich to 6.21%; A reduction in repo rate is not possible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.