नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटामुळे जगभरात टाळेबंदी सुरू आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. व्यवसाय होत नसल्यानं कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा कुठून हा प्रश्न कंपन्यांना आ वासून सतावतो आहे. त्यामुळे अनेक जण बेरोजगार होत आहेत. अशा संकटाच्या काळातही आपल्याला नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे. भारतीय पोस्ट ऑफिस विभागानं ७००हून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवाराला ही नोकरीची सुवर्णसंधी मिळवायची आहे, त्याला उत्तराखंड पोस्टल सर्कलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ७ जुलैपर्यंत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसेच पोस्टाच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान शैक्षणिक पात्रता मिळवलेली असावी किंवा ती व्यक्ती १०वी पास असावी.
८ जूनपासून पोस्टानं अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली असून, आज ७ जुलै रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १८ वर्ष किंवा जास्तीत जास्त ४० वर्षांपर्यंत असावं. उत्तराखंडच्या पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS)पदासाठी 724 जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे. किंवा सूचना पुढील लिंकवरून डाऊनलोड करून वाचा. सर्व माहितीबद्दल जागरूक व्हा आणि 07 जुलै 2020 पर्यंत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.
दुसरीकडे टपाल कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आलेले असल्याने कार्यालयात हजर राहणे त्यांना अनिवार्य आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अद्याप टपाल कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यालयात येत नसल्याचे चित्र आहे. टपाल कर्मचाऱ्यांना लोकल सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोकल प्रवासात कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. आजारपण, रजा व इतर मार्गांचा अवलंब करून कार्यालयात उपस्थित राहण्याचे टाळण्याकडे बहुतांश कर्मचा-यांचा कल आहे.