Lokmat Money >गुंतवणूक > ईशा आणि आकाश अंबानी यांचा हुरुन इंडियाच्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत समावेश

ईशा आणि आकाश अंबानी यांचा हुरुन इंडियाच्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत समावेश

2024 Hurun India Under35 List: ईशा आणि आकाश अंबानी यांचा हुरुन इंडियाच्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 06:54 PM2024-09-26T18:54:47+5:302024-09-26T18:55:24+5:30

2024 Hurun India Under35 List: ईशा आणि आकाश अंबानी यांचा हुरुन इंडियाच्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत समावेश

2024 Hurun India Under35 List: Isha and Akash Ambani included in Hurun India's List of Successful Entrepreneurs | ईशा आणि आकाश अंबानी यांचा हुरुन इंडियाच्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत समावेश

ईशा आणि आकाश अंबानी यांचा हुरुन इंडियाच्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत समावेश

2024 Hurun India Under35s List : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी जगातील अब्जाधीशांच्या यादीत सामील आहेत. विशेष म्हणजे, त्यांची मुलेही हळुहळू पुढे येत आहेत. रिलायन्स समूहातील रिलायन्स रिटेलच्या नॉन-एग्झीक्यूटिव्ह डायरेक्टर ईशा अंबानी(Isha Ambani) यांनी 35 वर्षांखालील यशस्वी उद्योजक म्हणून हुरुन इंडियाच्या अंडर 35 यादीत स्थान मिळवले आहे. 

ईशासोबत आकाश अंबानीचाही समावेश 
Hurun India ने देशातील 150 सर्वात यशस्वी उद्योजकांची 2024 Hurun India Under35 यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार शेअरचॅटचा अंकुश सचदेवा हा सर्वात तरुण उद्योजक म्हणून पुढे आला आहे. याशिवाय, आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांनाही या यादीत स्थान देण्यात आले असून, दोघेही 32 वर्षांचे आहेत. ईशा अंबानी रिटेल व्यवसाय तर आकाश अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या रूपाने टेलिकॉम व्यवसाय हाताळत आहेत.

123 पहिल्या पिढीतील उद्योजक
हुरुन इंडिया अंडर 35 च्या यादीत सात महिलांचा समावेश आहे, त्यापैकी चार कौटुंबिक वारसा पुढे चालवत आहेत. या यादीनुसार, 150 उद्योजकांपैकी 13 IIT मद्रास, 11 IIT Bombay, 10 IIT दिल्ली आणि IIT खरगपूरमधील उद्योजकांचा समावेश आहे. हुरुन इंडिया अंडर 35 यादीमध्ये 123 पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत, जे एकूण इंडक्टीच्या 82 टक्के आहेत.

जागतिक आव्हानांना न जुमानता यशस्वी उद्योजक बना
हुरुन इंडिया अंडर 35 ची यादी जाहीर करताना हुरुन इंडियाचे एमडी आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत आहे. या तरुण उद्योजकांनी जागतिक आव्हाने, महागाई आणि इतर आर्थिक संकटांचा सामना करून अत्यंत यशस्वी कंपन्या तयार केल्या आहेत. आमच्या अंदाजानुसार, 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योजकांनी तयार केलेल्या व्यवसायाचे मूल्य सुमारे $10 मिलियन आहे. तर, 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अधिक अनुभवी उद्योजकांनी $50 मिलियन मुल्यांकन असलेले व्यवसाय तयार केले आहेत, तर काहींनी यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मुल्यांकन असलेले व्यवसाय निर्माण केले आहेत.

Web Title: 2024 Hurun India Under35 List: Isha and Akash Ambani included in Hurun India's List of Successful Entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.