Lokmat Money >गुंतवणूक > पोस्टाच्या योजनांवरील व्याजदरात ३० बेसिस पॉईंट्सची वाढ, केंद्राचा मोठा निर्णय

पोस्टाच्या योजनांवरील व्याजदरात ३० बेसिस पॉईंट्सची वाढ, केंद्राचा मोठा निर्णय

सध्या अर्थव्यवस्थेत चढ्या व्याजदराचा कल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:35 AM2022-09-30T06:35:50+5:302022-09-30T06:36:09+5:30

सध्या अर्थव्यवस्थेत चढ्या व्याजदराचा कल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

30 basis points hike in interest rates on Post office schemes big decision by Centre | पोस्टाच्या योजनांवरील व्याजदरात ३० बेसिस पॉईंट्सची वाढ, केंद्राचा मोठा निर्णय

पोस्टाच्या योजनांवरील व्याजदरात ३० बेसिस पॉईंट्सची वाढ, केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : काही अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ३० आधार अंकांपर्यंत (बेसिस पाॅइंट) वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला. सध्या अर्थव्यवस्थेत चढ्या व्याजदराचा कल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, पोस्टातील तीन वर्षांच्या ठेवींवर चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आता ५.८ टक्के दराने व्याज मिळेल. आधी हा दर ५.५ टक्के होता. याचाच अर्थ या ठेवींवरील व्याजदरात ३० आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेचा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठीचा व्याजदर २० आधार अंकांनी वाढवून ७.६ टक्के करण्यात आला आहे.

आधी तो ७.४ टक्के होता. विकास पत्रांचा व्याजदर व कालावधी दोन्ही वाढविण्यात आले. मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात १४० आधार अंकांची वाढ केली आहे. 

Web Title: 30 basis points hike in interest rates on Post office schemes big decision by Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.