Join us  

सरकारी योजनेत १.५ लाखांच्या गुंतवणुकीवर ४.४८ लाखांचा परतावा, मुलीसाठी खातं उघडून मिळवा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 6:21 PM

योजनेअंतर्गत, वार्षिक १० हजार रुपये जमा केले जाऊ शकतात.

आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार पालकांना सुकन्या बचत योजनेचं खातं उघडण्यासाठी प्रवृत्त करत आहे. योजनेअंतर्गत, वार्षिक १० हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. मॅच्युरिटीच्या वेळी ही रक्कम ४.४८ लाख रुपये होईल.मुलींच्या नावावर गुंतवणूक करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना चालवली जात आहे. या योजनेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक करून मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी निधी जमा करता येतो. कोणतेही पालक आपल्या मुलींच्या नावे आपलं खातं उघडू शकता.किती मिळतं व्याजसुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ८ टक्के व्याज मिळतं. या योजनेअंतर्गत खातं उघडण्यासाठी मुलीचं वय १० वर्षांपेक्षा कमी असावं. ज्यामध्ये १५ वर्षे सातत्यानं गुंतवणूक केली जाते. हे एक संयुक्त खातं आहे. ज्यामध्ये मुलगी २१ वर्षांची झाल्यावर खात्यातून पैसे काढता येतात. ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे.१.५० लाखांवर किती परतावाजर तुम्हाला मुलगी असेल आणि तिचं वय २०२३ मध्ये ५ वर्षे असेल तर तुम्ही सुकन्या खाते उघडू शकता आणि वार्षिक १० हजार रुपये जमा करू शकता. अशाप्रकारे, खातं मॅच्युअर होईपर्यंत तुम्ही एकूण १,५०,००० रुपये जमा कराल आणि २,९८,९८९ रुपये या रकमेवरील व्याजदरांतर्गत जोडले जातील. अशा प्रकारे, २०४४ मध्ये मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला एकूण ४,४८,९६९ रुपये मिळतील.

टॅग्स :गुंतवणूकपैसा