Join us

ऑनलाईन शॉपिंगमध्ये खरच बचत होते का? बंपर डिस्काउंटमागे काय आहे कंपन्यांचं गणित?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 12:26 PM

Saving in Festive Season : आजच्या काळात ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी बचत होते, अशी मानसिकता निर्माण झाली आहे. मात्र, अनेकदा ऑफलाईन चांगल्या डिल्स मिळतात. यासाठी तुम्हाला काही टीप्स फॉलो करण्याची गरज आहे.

Saving in Festive Season : नवरात्रीपासून देशभरात सणासुदीला सुरुवात झाली आहे. सणउत्सव म्हणजे भारतीयांसाठी खरेदीचा हंगाम असतो. प्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन सारख्या अनेक ई-कॉमर्स कंपन्या आणि ऑफलाइन स्टोअर्सनी देखील बंपर डिस्काउंट आणला आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनेक लोक जोरदार खरेदीही करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात वस्तू खरेदी करताना आपली खरच बचत होत आहे का? हा खरा प्रश्न आहे. कारण विक्री वाढवण्यासाठी सवलतीचे आमिष दिले जात असले तरी दुसरीकडे दरवाढ करून छुप्या पद्धतीने ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. जर तुम्हीही सणासुदीच्या खरेदीसाठी प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही चांगली वस्तू खरेदी करण्यासोबत भरगोस बचतही करू शकता.

ऑनलाइन आणि ऑफलाइन किमतीची तुलना कराआजच्या काळात ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी बचत होते, अशी मानसिकता निर्माण झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही. तुम्हाला अनेक समान उत्पादने चांगल्या दरात ऑफलाइन देखील मिळतील. त्यामुळे या सणासुदीच्या काळात खरेदी करण्यापूर्वी तुलना करायला विसरू नका. अगोदर वेगवेगळ्या वेबसाइटवरील किमतींची तुलना करा. मग ऑफलाइनही दर तपासा. यानंतर तुम्हाला कुठे चांगली डील मिळतेय हे लक्षात येईल. जर तुम्ही थोडा अभ्यास केला तर बचत १०० टक्के होणार.

बजेट आणि यादी बनवाया सणासुदीत तुम्हाला काय खरेदी करायचं आहे, याची यादी तयार करा. त्या यादीशी प्रामाणिक राहा. अनेकदा ग्राहक आकर्षक डील आणि ऑफर्समुळे अनावश्यक गोष्टी खरेदी करतात. आजच्या काळात क्रेडिट कार्ड सहज उपलब्ध झाल्याने कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे, जर तुम्ही यादी तयार करून खरेदी केली तर तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकाल. याचे दोन फायदे होतील. तुमची मोठी बचत होईल आणि विनाकारण कर्जाचे ओझे होणार नाही.

योग्य क्रेडिट कार्ड निवडासर्व क्रेडिट कार्ड सारखे  दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये फरक असतो. सणाच्या खरेदीसाठी असेच क्रेडिट कार्ड निवडा ज्यावर लोकप्रिय रिटेलर्स किंवा ई-कॉमर्स कंपन्यांकडून विशेष ऑफर उपलब्ध असतात. ज्या कार्डांवर बंपर सवलत किंवा कॅशबॅक उपलब्ध आहेत ते सर्वोत्तम आहेत. अनेक कार्ड कॅशबॅक पॉइंट ऑफर करतात जे तुम्ही कधीही वापरत नाही. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कार्ड असल्यास, त्या सर्वांवर उपलब्ध असलेल्या ऑफरची पूर्णपणे तुलना करा.

नो कॉस्ट ईएमआयचा झोलअनेक बँका आणि फायनान्स कंपन्या आता नो कॉस्ट ईएमआयवर वस्तू खरेदीची संधी उपलब्ध करुन देत आहेत. ग्राहकही नो कॉस्ट ईएमआय म्हटल्यावर लगेच भाळतात. मात्र, यापाठीमागील गणित समजून घेणे आवश्यक आहे. कुठलीही बँक किंवा कंपनी तुम्हाला फुकट काही देत नाही. यामागे यांच्या काहीतरी स्वार्थ नक्कीच असतो. नो कॉस्ट ईएमआय जरी फ्री वाटत असला तरी याला काही छुपे शुल्क लागतात. यामध्ये प्रोसेसिंग फी सारख्या शुल्कांचा समावेश असतो. त्यामुळे तुम्हाला फ्री वाटत असले तरी जास्त पैसे द्यावे लागतात.

टॅग्स :खरेदीफ्लिपकार्टअ‍ॅमेझॉनऑनलाइन