Join us  

50व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? अशी करा गुंतवणूक, जमा होईल 5 कोटींचा फंड...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 7:45 PM

5 Crore Rupees Fund: महिन्याला इतक्या रुपयांची गुंतवणूक करुन मिळवा कोट्यवधीचा फंड.

5 Crore Rupees Corpus : सध्या भारतासह जगभरातील अनेक देशात लवकर निवृत्ती घेण्याचा ट्रेंड आहे. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या अनेकांना वाटते की, म्हातारपणीसाठी आताच पैशाची व्यवस्था करुन ठेवली, तर 60 वर्षांपर्यंत काम करण्याची गरज नाही. अशा लोकांना लवकर निवृत्ती घेऊन त्यांचे उर्वरित आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो. आम्ही तुम्हाला अशा 3 स्ट्रॅटेजी सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हीदेखील वयाच्या 50 व्या वर्षी 5 कोटी रुपयांचा निधी मिळवू शकता आणि लवकर निवृत्त होऊन आयुष्याचा आनंद लुटू शकता. 

स्ट्रॅटेजी 1 समजा तुमचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षी निवृ्त्ती घ्यायची आहे. आता तुमच्याकडे गुंतवणूकीसाठी 24 वर्षे शिल्लक आहेत. 50 व्या वर्षी 5 कोटी रुपयांच्या निधीसाठी तुम्हाला वार्षिक 1,92,500 रुपयांची, म्हणजेच दरमहा 16,042 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणूकीवर 10 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यावर 50 व्या वर्षी तुमच्याकडे 5 कोटी रुपयांचा फंड जमा होईल.

स्ट्रॅटेजी 2समजा तुमचे 30 वर्षे आहे आणि तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षी निवृ्त्ती घ्यायची आहे. आता तुमच्याकडे गुंतवणूकीसाठी 19 वर्षे शिल्लक आहेत. 50 व्या वर्षी 5 कोटी रुपयांच्या निधीसाठी तुम्हाला वार्षिक 4 लाख रुपयांची, म्हणजेच दरमहा 33,333 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 1 लाख रुपये मासिक पगार असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 30 टक्के बचत करावी लागेल. अशा रितीने तुमच्याकडे 50 व्या वर्षी 5 कोटी रुपये असतील.

स्ट्रॅटेजी 335 वर्षे वयाच्या लोकांना 50 वर्षांपर्यंत 5 कोटी रुपये मिळवायचे असतील, तर त्यांच्याकडे बचत करण्यासाठी फक्त 14 वर्षे शिल्लक आहेत. तुमचे लक्ष्य 5 कोटी रुपये असेल, तर तुम्हाला दरवर्षी 8,85,000 रुपये वाचवावे लागतील. महिन्याला 73,750 रुपयांची बचत केल्यास, तुमची वार्षिक 8.85 लाख रुपयांची बचत होईल. यावर सरासरी 10 टक्के परतावा गृहीत धरून तुम्ही तुमचे 5 कोटी रुपयांचे लक्ष्य गाठू शकता.

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :गुंतवणूकव्यवसाय