Lokmat Money >गुंतवणूक > Interest Rate On FD : FD वर मिळतेय 9 टक्के एवढे जबरदस्त व्याज, या बँकेची स्पेशल स्कीम; जाणून घ्या सविस्तर

Interest Rate On FD : FD वर मिळतेय 9 टक्के एवढे जबरदस्त व्याज, या बँकेची स्पेशल स्कीम; जाणून घ्या सविस्तर

Interest Rate On FD : जर आपण या दिवसांत FD चा प्लॅन आखत असाल, तर या स्कीमचा लाभ घेऊ शकता...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 10:41 AM2022-12-10T10:41:47+5:302022-12-10T10:42:21+5:30

Interest Rate On FD : जर आपण या दिवसांत FD चा प्लॅन आखत असाल, तर या स्कीमचा लाभ घेऊ शकता...

9 percent interest on FD, a special scheme of Small unity finance bank on 181 days fd Know about detail | Interest Rate On FD : FD वर मिळतेय 9 टक्के एवढे जबरदस्त व्याज, या बँकेची स्पेशल स्कीम; जाणून घ्या सविस्तर

Interest Rate On FD : FD वर मिळतेय 9 टक्के एवढे जबरदस्त व्याज, या बँकेची स्पेशल स्कीम; जाणून घ्या सविस्तर

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा रेपो रेट वाढवला आहे. रेपोरेटमध्ये 0.35 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर, बँकांनी आपले कर्जही महाग करायला सुरुवात केली आहे. याच बरोबर बँका आगामी दिवसांत फिक्‍स डिपॉजिटवरील (एफडी) व्याज दरही वाढू शकतात. यातच, एक बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉजिटवर बम्पर व्याज देत आहे. जर आपण ज्येष्ठ नागरीक असाल, तर यूनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या (युनिटी बँक) फिक्‍स डिपॉजिट स्कीममध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.

किती दिवसांची आहे FD स्कीम? -
ज्येष्ठ नागरिकांसाठी युनिटी स्मॉल बँक फिक्स्ड डिपॉजिटवर 9 टक्के व्याज देत आहे. हा व्याज दर मिळविण्यासाठी युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत ज्येष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसांसाठी एफ डी करावी लागेल. यानंतर त्यांना 9 टक्के दराने व्याज मिळू शकेल. याच बरोबर, रिटेल गुंतवणूकदारांना या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉजिटवर 8.50 टक्के दराने व्याज मिळेल. जर आपण या दिवसांत FD चा प्लॅन आखत असाल, तर या स्कीमचा लाभ घेऊ शकता.

इतर लोकांसाठी काय आहे व्याजदर - 
ज्येष्ठ नागरिकांशिवाय, इतर वयोगटातील लोकांना 181 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 8.50 टक्के दराने व्याज मिळेल. बँक 182 दिवसांपासून 364 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 6.75 टक्के दराने व्याज ऑफर करत आहे. युनिटी बँक ही एक शेड्यूल्ड कमर्शिअल बँक आहे. सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही ज्वॉइंट इन्व्हेस्टर म्हणून रेसिलियंट इनोव्हेशन्स प्रायव्हेटसह हिचे प्रमोटर आहे.

Web Title: 9 percent interest on FD, a special scheme of Small unity finance bank on 181 days fd Know about detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.