Join us  

Senior Citizens ना व्याजाद्वारे मोठी कमाई करून देणारी स्कीम, पाहा १ ते १५ लाखांवर किती मिळतील रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 2:23 PM

या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही रिटायरमेंटनंतरही मोठा फंड तयार करू शकता.

सध्या जितका आपल्याला पैसा महत्त्वाचा असतो तितकाच तो रिटायरमेंटनंतरही गरजेचाच असतो. रिटायरमेंटनंतर कामाला यावा यासाठी पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला व्याजाचाही फायदा मिळतो आणि रक्कमही वाढत राहते. सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (Senior Citizen Saving Scheme- SCSS) प्रामुख्यानं अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या या योजनेवर चांगलं व्याज मिळत आहे. सध्या यावर 8.2 टक्क्यांनी व्याज दिलं जातं आहे. कोणतीही व्यक्ती ज्याचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, तो या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतो. याशिवाय ज्यांचं वय 55-60 वर्षांदरम्यान आहे आणि ज्यांनी व्हीआरएस घेतली असेल आणि निवृत्त संरक्षण कर्मचारी, ज्यांचं किमान वय 60 वर्षे असेल ते यात गुंतवणूक करू शकतात.30 लाखांपर्यंत करू शकता गुंतवणूकया स्कीममध्ये 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि कमाल 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. यापूर्वी ही मर्यादा 15 लाख होती. खात उघडल्यानंतर 5 वर्षांमध्ये ही रक्कम मॅच्युअर होते. जमा रकमेवर तिमाही आधारावर व्याज दिलं जातं. याशिवाय सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये टॅक्स बेनिफिट्सही मिळतात.1 ते 15 लाखांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न

1,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 1,41,000 रुपये मिळतील.2,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 2,82,000 रुपये मिळतील.3,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 4,23,000 रुपये मिळतील.4,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 5,64,000 रुपये मिळतील.5,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 7,05,000 रुपये मिळतील.6,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 8,46,000 रुपये मिळतील.7,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 9,87,000 रुपये मिळतील.8,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 11,28,000 रुपये मिळतील.9,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 12,69,000 रुपये मिळतील.10,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 14,10,000 रुपये मिळतील.11,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 15,51,000 रुपये मिळतील.12,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 16,92,000 रुपये मिळतील.13,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 18,33,000 रुपये मिळतील.14,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 19,74,000 रुपये मिळतील.15,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर 21,15,000 रुपये मिळतील.

टॅग्स :पैसागुंतवणूक