Join us  

₹५००० च्या SIP मधून बनवू शकता ₹२.६० कोटी, पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 10:24 AM

SIP Investment : ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी मोठा पैसा कमावलाय, असं एएमएफआयच्या आकडेवारीवरून दिसून येतं.

SIP Investment : म्युच्युअल फंड एसआयपी हे दीर्घकालीन गुंतवणुकीचं प्रभावी साधन मानलं जातं. ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी मोठा पैसा कमावलाय, असं एएमएफआयच्या आकडेवारीवरून दिसून येतं. एसआयपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कमी रकमेतून दीर्घ मुदतीत कोट्यवधी रुपये तयार करू शकता. आज आपण आज जाणून घेणार आहोत की ५००० रुपयांपासून एसआयपी सुरू करून २.६० कोटी रुपयांचा फंड कसा तयार केला जाऊ शकतो.

स्टेप अप फॉर्म्युलाची मदत

जर तुम्ही ५००० रुपयांपासून एसआयपी सुरू केली आणि दरवर्षी तुमची एसआयपी ५ टक्क्यांनी वाढवली तर हे उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकते. आता स्टेप-अप फॉर्म्युला आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यास कशी मदत करेल हे समजून घेऊया.

५ हजार गुंतवल्यास किती रिटर्न

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं २५ व्या वर्षी ५००० रुपयांसह एसआयपी सुरू केली. ती व्यक्ती आता दरवर्षी आपल्या एसआयपीमध्ये ५-५ टक्के वाढ करत आहे. त्यानुसार त्या व्यक्तीनं सलग ३० वर्षे एसआयपी सुरू ठेवल्यास त्याची एकूण गुंतवणूक ३९ लाख ८६ हजार ३३१ रुपये होईल. या गुंतवणुकीवर त्या व्यक्तीला वार्षिक सरासरी १२ टक्के परतावा मिळाला तर ३० वर्षांत तो २.६३ कोटी रुपयांचा फंड तयार करू शकतो. 

जर शेअर बाजार चांगली कामगिरी करत असेल आणि त्याला वार्षिक सरासरी १५ टक्के परतावा मिळाला तर ३० वर्षांत त्याच्याकडे ४.८९ रुपयांचा मोठा निधी तयार होऊ शकतो.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा