Join us  

PPF, NSC सारख्या योजनांत गुंतवणूक केली असेल तर अकाऊंट होऊ शकतं फ्रीज, पाहा अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 3:45 PM

तुम्ही पीपीएफ, एनएसई आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (SCSS) सारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमचं खातं गोठवलं जाऊ शकते. पाहा कारण

Aadhaar Linking with small savings schemes: तुम्ही पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (SCSS) सारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमचं खातं गोठवलं जाऊ शकते. या खात्यांशी तुमचा आधार लिंक करणं आवश्यक आहे. यासाठी ३० सप्टेंबर २०२३ ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.

या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खातं उघडलं असेल, अशा परिस्थितीत या खात्यांशी आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ३० सप्टेंबरपर्यंत तुमचं आधार या योजनांशी लिंक न केल्यास तुमचं खातं गोठवलं जाईल.

दरम्यान, अर्थ मंत्रालयानं छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार अनिवार्य केलं आहे. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी यापूर्वी ही खाती उघडली आहेत त्यांच्या खात्यांशी आधार लिंक करणं देखील बंधनकारक आहे. हे लक्षात घेऊन सरकारनं ही मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. यासाठी सरकारनं ३१ मार्च २०२३ रोजी अधिसूचना जारी केली होती.

लिंक न केल्यास?जर तुम्ही तुमचं आधार या योजनांशी लिंक केले नाही, तर या योजनांचे व्याज तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुमचं खातं गोठवले जाईल, जेणेकरून मॅच्युरिटीची रक्कमही मॅच्युरिटीनंतर जमा होणार नाही.

कसं कराल लिंक?तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं आधार लिंक करू शकता. ऑफलाइन आधार लिंक करण्यासाठी, तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जावं लागेल आणि तिकडून आधार लिंकिंग फॉर्म भरून आधारच्या प्रतीसह आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या वेबसाइट किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारे देखील हेच काम ऑनलाइन करू शकता.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूकआधार कार्ड