Lokmat Money >गुंतवणूक > अदानी ग्रुप आणि Google ने केला करार, 'या' क्षेत्रात करणार मोठे काम; भारताचा फायदा

अदानी ग्रुप आणि Google ने केला करार, 'या' क्षेत्रात करणार मोठे काम; भारताचा फायदा

गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात या कराराची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:57 PM2024-10-03T16:57:42+5:302024-10-03T16:58:32+5:30

गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात या कराराची घोषणा केली.

Adani-Google Deal: Adani Group and Google have signed an agreement, to do big work in 'this' sector; India's advantage | अदानी ग्रुप आणि Google ने केला करार, 'या' क्षेत्रात करणार मोठे काम; भारताचा फायदा

अदानी ग्रुप आणि Google ने केला करार, 'या' क्षेत्रात करणार मोठे काम; भारताचा फायदा

Adani-Google Deal : गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाने टेक जायंट Google सोबत एक करार केला आहे. गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात या कराराची घोषणा केली, तर अदानी समूहाने एका निवेदनात याबाबत सविस्तर माहिती दिली. या भागीदारीद्वारे अदानी समूह गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठ्या रिन्युएबल एनर्जी प्रकल्पात असलेल्या नवीन सौर-पवन संकरित प्रकल्पातून क्लीन एनर्जीचा पुरवठा करेल. हा नवीन प्रकल्प 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

उद्योगांना डीकार्बोनाइझ करण्यास मदत
रिपोर्ट्सनुसार, या पवन, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या उर्जेच्या गरजा पूर्ण होतील. याशिवाय, वातावरणात पसरणारे कार्बनडायकॉक्साइट कमी करण्यास मदत होईल. 

भारतात या गोष्टींमध्ये मदत मिळेल
या भागीदारीद्वारे Google चे 24/7 कार्बन मुक्त ऊर्जा उद्दिष्ट पुढे नेण्यास मदत होईल आणि भारतातील क्लाउड सेवा आणि ऑपरेशन्स स्वच्छ ऊर्जेसह सक्षम होतील. अशा प्रकारे Google च्या भारतातील शाश्वत वाढीस हातभार लागेल. 

अदानी ग्रुप आणि गुगलचा व्यवसय
अहमदाबादमध्ये मुख्यालय असलेला अदानी समूह हा भारतातील सर्वात मोठा आणि वैविध्यपूर्ण व्यवसायांचा सर्वात वेगाने वाढणारा समूह आहे. ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स (बंदरे, विमानतळ, शिपिंग आणि रेल्वेसह), नैसर्गिक संसाधने आणि ग्राहक क्षेत्रामध्ये अदानी समूहाने आपले स्थान मजबूत केले आहे. तर Google ही Alphabet Inc ची उपकंपनी आहे. Google मध्ये सर्च, मॅप्स, Gmail, Android, Google Play, Google Cloud, Chrome आणि YouTube सारखी उत्पादने आणि प्लॅटफॉर्मस आहेत.

Web Title: Adani-Google Deal: Adani Group and Google have signed an agreement, to do big work in 'this' sector; India's advantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.