Join us  

अमेरिकेत सुरू असलेल्या चौकशीवर Adani Group चे स्पष्टीकरण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 6:02 PM

अमेरिकेत अदानी समूहाच्या अमेरिकन गुंतवणूकदारांची चौकशी सुरू असल्याची बातमी समोर आली आहे.

Adani Group News: अदानी समूहाबाबत दोन दिवसांपूर्वी एक खुलासा झाला होता की, अमेरिकन नियामक त्यांच्या अमेरिकन गुंतवणूकदारांची चौकशी करत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर आता अदानी समूहाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने खुलासा केला होता की, यूएस अॅटर्नी ऑफिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन अदानी ग्रुपने यूएस गुंतवणूकदारांशी काय संवाद साधला याची चौकशी करत आहेत.

याबाबत अदानी समूहाकडून सांगण्यात आले की, आमची संपूर्ण माहिती पब्लिक रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे. आमच्या अमेरिकन गुंतवणूकदारांना समन्स बजावले आहे, त्याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. समूहाने म्हटले की, आमची सर्व कामे नियमांमध्ये राहूनच केली आहेत. अमेरिकन नियामक वेळोवेळी चौकशी करत असतात, ही चौकशीदेखील त्याचाच भाग आहे. 

हिंडेनबर्गवर टीकाहिंडनबर्ग रिसर्चने जाणीवपूर्वक अदानी समूहाबाबत चुकीची रिपोर्ट प्रसिद्ध केली होती. शेअर्सच्या घसरणीतून समूहाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे आणि नफा कमवणे, हा यामागचा हेतू होता. अदानी समूहाच्या डिस्कोजरमध्ये म्हटले की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्य केले की, अदानी समूहाने कर्ज कमी करणे, गुंतवणूक वाढवणे यासारखी अनेक पावले उचलली आहेत, जी गुंतवणूकदारांच्या हिताची आहेत. यामुळे गुंतवणूकदारांची संख्याही वाढली आहे. न्यायालयाने सेबीला वेळ दिला आहे आणि आम्हाला खात्री आहे की, अदानी समूह यासाठी सर्व प्रकारे सहकार्य करत आहे, असेही म्हटले आहे.

टॅग्स :गौतम अदानीअदानीअमेरिका