Adani Gas Investment : हिंडनबर्ग प्रकरणातून बाहेर आल्यानंतर आता दिग्गज भारतीय उद्योगपती गौतम अदानी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहेत. यातच आता अदानी समूह आणि फ्रेंच कंपनी टोटल एनर्जीज यांची संयुक्त कंपनी असलेली अदानी टोटल गॅस लिमिटेड (Adani Total Gas Ltd.) येत्या आठ-दहा वर्षांत 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून गॅस वितरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम केले जाईल.
अदानी टोटल गॅस लिमिटेडच्या (ATGL) वार्षिक अहवालातून अशी माहिती समोर आली आहे की, वाहनांसाठी लागणाऱ्या सीएनजीच्या0 किरकोळ विक्रीसह घरगुती गॅस आणि उद्योगांना पाइपलाईद्वारे गॅस पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विस्तार करुन पुढील आठ ते दहा वर्षांत 18,000 कोटी रुपये ते 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
कंपनीकडे 460 सीएनजी स्टेशन देशातील 124 जिल्ह्यांमध्ये वाहनांसाठी सीएनजी विकण्याव्यतिरिक्त, कंपनी पाईपद्वारे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही करते. कंपनीची देशात 460 सीएनजी स्टेशन्स आहेत आणि पाइप्ड गॅसचे सुमारे सात लाख ग्राहक आहेत. नवीन वार्षिक अहवालानुसार, कंपनीने अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,150 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
समूह व्यवसायाबद्दल आशावादीकंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) पराग पारीख म्हणाले, आमच्या गॅस व्यवसायाबद्दल आम्ही आशावादी आहोत. कंपनी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. आमच्या गॅस वितरण व्यवसायासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही सूमारे 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. एटीजीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुरेश पी मंगलानी म्हणाले की, परवानाधारक भागात स्टील पाइपलाइन टाकण्याच्या कामाला गती देणे आणि सीएनजी स्टेशन वाढवणे ही कंपनीची रणनीती आहे. कंपनी येत्या सात ते 10 वर्षांत 1,800 हून अधिक सीएनजी स्टेशन तयार करणार आहे.