Gold Silver Price Today 28 November: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव २५९ रुपयांनी घसरून ७५,९१६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरात आज ७७५ रुपयांची घसरण झाली. आज चांदी ८७,१९७ रुपयांवर उघडली. हा दर आयबीएनं जाहीर केलेला आहे, ज्यावर जीएसटीचा समावेश नाही.
लाईव्ह मिंटनुसार दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,२२० रुपयांवर पोहोचला आहे. बुधवारी तो ७८७१३ रुपयांवर होता. गेल्या आठवड्यात २२ तारखेला सोन्याचा भाव ७७१३३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज चांदीचा भाव ९२,५०० रुपये प्रति किलो होता तर काल ९४, ५०० रुपये प्रति किलो होता.
चेन्नईत सोन्याचा किती
चेन्नईत आज सोन्याचा भाव ७७,५४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला. तर बुधवारी ७८,५६१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. गेल्या आठवड्यात २२ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,९८१ रुपये होता. आज चेन्नईत चांदीचा भाव १००६०० रुपये प्रति किलो आहे. काल तो १०३१०० रुपये आणि गेल्या आठवड्यात चांदीचा भाव १०३६०० रुपये प्रति किलो होता.
मुंबईत सोन्याचा दर
आज मुंबईत १० ग्रॅम सोन्याचा भाव ७७५४७ रुपये आहे. बुधवारी तो ७८,५६७ रुपये होता आणि गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ७९,९८७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत आज चांदीचा भाव ९१,८०० रुपये प्रति किलो तर काल ९३,३०० रुपये होता. गेल्या आठवड्यात तो ९४,३०० रुपये प्रति किलो होता.
कोलकात्यात आज सोन्याचा दर किती?
कोलकात्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७५,५१० रुपये आहे. काल याची किंमत ७८,५६५ रुपये होती आणि गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत ७७,९८५ रुपये होती. कोलकात्यात आज चांदीचा भाव ९३,३०० रुपये प्रति किलो होता. तर काल तो ९५,३०० रुपये प्रति किलो होता.