Lokmat Money >गुंतवणूक > इंडिगो आणि एअर इंडियानंतर Akasa Air करणार शॉपिंग; इतकी विमाने खरेदी करणार...

इंडिगो आणि एअर इंडियानंतर Akasa Air करणार शॉपिंग; इतकी विमाने खरेदी करणार...

अलीकडेच एअर इंडियाने 470 तर इंडिगोने 500 विमाने खरेदीचा करार केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:26 PM2023-06-21T19:26:38+5:302023-06-21T19:27:38+5:30

अलीकडेच एअर इंडियाने 470 तर इंडिगोने 500 विमाने खरेदीचा करार केला आहे.

After IndiGo and Air India, Akasa air will shop for aircraft; How many planes will buy? | इंडिगो आणि एअर इंडियानंतर Akasa Air करणार शॉपिंग; इतकी विमाने खरेदी करणार...

इंडिगो आणि एअर इंडियानंतर Akasa Air करणार शॉपिंग; इतकी विमाने खरेदी करणार...


Akasa Air:इंडिगो आणि एअर इंडियानंतर आता आणखी एक विमान कंपनी मोठ्या प्रमाणात विमान खरेदी करणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनी सुरू केलेल्या 'आकासा एअर' 737 मॅक्स विमानांच्या ऑर्डरसाठी बोइंग कंपनीशी बोलणी करत आहे. आकासा 10 विमानांपर्यंत खरेदी करू शकते. या कराराची माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल. 

भारतातील सर्वात नवीन एअरलाइन Akasa ने गेल्या वर्षीच उड्डाण करण्यास सुरुवात केली. कंपनीला आधीच ऑर्डर केलेल्या 72 मॅक्स जेटपैकी 20 मिळाले आहेत. ही एअरलाइन ज्येष्ठ गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला कुटुंबाच्या मालकीची आहे. 

एअर इंडिया करार: अलीकडेच टाटांची कंपनी एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगसोबत सुमारे $70 अब्ज डॉलरचा करार केला आहे. एअर इंडिया या कराराअंतर्गत 470 विमाने खरेदी करणार आहे. एअरलाइनने या वर्षी फेब्रुवारीमध्ये या कराराविषयी माहिती दिली होती. या करारांतर्गत 34 A350-1,000, सहा A350-900, 20 Boeing 787 Dreamliners आणि 10 Boeing 777X वाइडबॉडी विमाने, 140 Airbus A320neo, 70 Airbus A321neo आणि 190 बोईंग स्मॉल एअरक्राफ्ट खरेदी केले जाणार आहेत.

इंडिगोचा करार: यापूर्वी इंडिगोने युरोपियन विमान निर्माता कंपनी एअरबसला 500 विमानांची ऑर्डर दिली आहे. 2030 ते 2035 या कालावधीत 500 विमानने खरेदी केले जातील. आता एअरलाइनच्या ऑर्डरबुकमध्ये 1 हजार विमानांचा समावेश असेल. इंडिगोने यापूर्वी 480 विमानांची ऑर्डर दिली होती, जी अद्याप मिळणे बाकी आहे. सध्या इंडिगोच्या ताफ्यात 300 हून अधिक विमाने आहेत.

Web Title: After IndiGo and Air India, Akasa air will shop for aircraft; How many planes will buy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.