Lokmat Money >गुंतवणूक > Koo बंद झाल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने सुरू केला नवीन व्यवसाय; निधीही मिळवला...

Koo बंद झाल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने सुरू केला नवीन व्यवसाय; निधीही मिळवला...

Koo चे माजी सह-संस्थापक मयंक बिदावतकाने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 08:55 PM2024-09-19T20:55:19+5:302024-09-19T20:56:22+5:30

Koo चे माजी सह-संस्थापक मयंक बिदावतकाने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

After Koo's closure, the company's founder started a new business; Also got funding... | Koo बंद झाल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने सुरू केला नवीन व्यवसाय; निधीही मिळवला...

Koo बंद झाल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने सुरू केला नवीन व्यवसाय; निधीही मिळवला...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo बंद पडल्यानंतर कंपनीचे माजी सह-संस्थापक मयंक बिदावतका  (Mayank Bidawatka) यांनी आता एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे यासाठी त्यांनी मोठा निधीही उभारला आहे. त्यांनी बिलियन हार्ट्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज (Billion Hearts Software Technologies) नावाचा एक नवीन स्टार्टअप सुरू केला आहे, ज्यासाठी त्यांनी सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. हा निधी Flipkart चे माजी CTO आणि redBus, Ola, InMobi आणि Myntra यासह इतर काही गुंतवणूकदारांकडून जमा केला आहे.

या फंडिंग राउंडमध्ये एकूण 13 गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये 3 VC फर्मचाही समावेश आहे. काही कंझ्यूमर टेक आंत्रप्रेन्योर्स आणि कॉरपोरेट एक्झिक्युटिव्ह यांनीही यामध्ये पैसे गुंतवले आहेत. कंपनी या वर्षाच्या अखेरीस आपल्या उत्पादनाचे बीटा व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जगभरात स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येइतका या प्रोडक्टचा मार्केट साईज असेल, असे बोलले जात आहे.

काही काळापूर्वी Koo बंद करण्यात आले 
काही काळापूर्वी भारतातील koo हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले होते. सहसंस्थापक मयंक बिदावतका यांनी स्वतः लिंक्डइन हँडलवरुन ही माहिती दिली होती. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक यांनी ट्विटर सारखेच Koo तयार केले होते. पण, त्यांच्या या अॅपला फार प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना आपले अॅप बंद करावे लागले.

 

Web Title: After Koo's closure, the company's founder started a new business; Also got funding...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.