Air India Vistara Merger: टाटा समूहाच्या नेतृत्वातील एअर इंडियाकडे सध्या शेकडो विमानांचा ताफा आहे. याद्वारे दर आठवड्याला 8,500 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाणे चालवली जातात. पण, आता एअर इंडियामध्ये विस्ताराच्या विलिनीकरणानंतर कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आता एअर इंडिया भारतातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि दुसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमानसेवा कंपनी बनणार आहे.
एअर इंडिया समूहाकडे एकूण 300 विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात 80 छोटी आणि 60 मोठी विमाने आहेत, तर विस्ताराकडे 63 छोटी आणि 7 मोठी विमाने आहेत. याशिवाय, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये 90 छोटी विमाने आहेत. म्हणजेच, एअर इंडिया समूहाकडे एकूण 300 विमाने आहेत. यातील 55 देशांतर्गत आणि 48 आंतरराष्ट्रीय अशा एकूण 103 गंतव्यस्थानांवर सेवा देत आहेत.
दर आठवड्याला 8500 उड्डाणेसध्या विमान कंपनी 312 मार्गांवर उड्डाण करत आहे, ज्यामध्ये 160 देशांतर्गत आणि 152 परदेशी मार्गांचा समावेश आहे. दर आठवड्याला एकूण फ्लाइट्सची संख्या अंदाजे 8,500 आहे. समूहाच्या ताफ्यात बोइंग 777-300ER, 777-200 LR, 787-8, 787-9, A320 फॅमिली प्लेन आणि A350 यांचाही समावेश आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, एअर इंडिया, विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांचा देशांतर्गत बाजारातील हिस्सा 29 टक्क्यांहून अधिक आहे. समूह आपल्या कार्याचा विस्तार करत आहे आणि येत्या काही महिन्यांत आणखी विमाने जोडली जातील.