Lokmat Money >गुंतवणूक > ग्रीन सेक्टर गाजवण्यासाठी सज्ज; 'या' मोठ्या डीलसाठी अदानी आणि अंबानी आमने-सामने

ग्रीन सेक्टर गाजवण्यासाठी सज्ज; 'या' मोठ्या डीलसाठी अदानी आणि अंबानी आमने-सामने

या दोन्ही उद्योग समूहांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 04:00 PM2023-12-17T16:00:33+5:302023-12-17T16:01:54+5:30

या दोन्ही उद्योग समूहांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे.

Ambani-Adani: Set to dominate green sector; Adani and Ambani go head-to-head for 'this' big deal | ग्रीन सेक्टर गाजवण्यासाठी सज्ज; 'या' मोठ्या डीलसाठी अदानी आणि अंबानी आमने-सामने

ग्रीन सेक्टर गाजवण्यासाठी सज्ज; 'या' मोठ्या डीलसाठी अदानी आणि अंबानी आमने-सामने

Ambani-Adani: दिग्गज भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. हे दोन्ही उद्योगपती सातत्याने आपला व्यवसाय वाढवत आहे. दोन्ही समूहांनी गेल्या काही वर्षांत अनेक क्षेत्रांमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. आता ग्रीन सेक्टरमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यायसाठी दोघेही सज्ज झाले आहेत. यासाठी दोन्ही समूहांनी इलेक्ट्रोलायझरच्या लिंक ग्रांटसाठी बोली लावली आहे. विशेष म्हणजे, यात आणखी 21 कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

भारत सरकारने ग्रीन हायड्रोजन (Green Hydrogen) आणि इलेक्ट्रोलायझर्सच्या उत्पादनासाठी सुमारे 19 हजार 930 कोटी रुपयांचे अनुदान देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. रिलायन्स इलेक्ट्रोलायझर मॅन्युफॅक्चरिंग, अदानी न्यू इंडस्ट्रीज, एल अँड टी इलेक्ट्रोलायझर्स आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्ससह 21 कंपन्यांनी इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी सरकारकडून या प्रोत्साहनासाठी बोली लावली आहे.

1.5 GW इलेक्ट्रोलायझरसाठी बोली लावा
अधिकृत विधानानुसार, भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने  (Indian Solar Energy Corporation) 1.5 GW इलेक्ट्रोलायझर उत्पादन क्षमता स्थापित करण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या, परंतु वार्षिक 3.4 GW इलेक्ट्रोलायझर उत्पादन क्षमता स्थापित करण्यासाठी प्रोत्साहनात्मक बोली लावण्यात आली आहे. इलेक्ट्रोलायझरचा वापर हायड्रोजन उत्पादनात केला जातो.

कोणत्या कंपन्या शर्यतीत?
या योजनेंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी समूहाव्यतिरिक्त, हिल्ड इलेक्ट्रिक प्रायव्हेट, ओहमियम ऑपरेशन्स, जॉन कॉकरिल ग्रीनको हायड्रोजन सोल्युशन्स, वारी एनर्जी, जिंदाल इंडिया, अवडा इलेक्ट्रोलायझर, ग्रीन एच2 नेटवर्क इंडिया, अद्वैत इन्फ्राटेक, एसीएमई क्लीनटेक सोल्युशन्स, ओरियाना पॉवर, मॅट्रिक्स गॅस अँड रिन्युएबल्स, एचएचपी सेव्हन, होमीहायड्रोजन, न्यूट्रेस, सी डॉक्टर अँड कंपनी, प्रतिष्ठा इंजिनिअर्स आणि लिव्हहे एनर्जी कंपन्यांचा समावेश आहे.

5.53 लाख टन ग्रीन हायड्रोजनसाठी बोली
14 कंपन्यांनी 5.53 लाख टन ग्रीन हायड्रोजन क्षमतेच्या उत्पादनासाठी अर्ज केले आहेत, तर केवळ 4.5 लाख टन क्षमतेसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये टोरेंट पॉवर, रिलायन्स ग्रीन हायड्रोजन आणि भारत पेट्रोलियमसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
 

Web Title: Ambani-Adani: Set to dominate green sector; Adani and Ambani go head-to-head for 'this' big deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.