Join us  

ईशा अंबानी थेट रतन टाटांना टक्कर देणार; मुंबईत सुरू केले पहिले स्टोअर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 6:32 PM

रतन टाटांच्या स्टारबक्स इंडियाला टक्कर देण्यासाठी ईशा अंबानीने भारतात प्रसिद्ध परदेशी ब्रँड आणला आहे.

Isha Ambani Business: मुकेश अंबानी (mukesh ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (isha ambani) आपल्या वडीलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. तिच्याकडे रिलायन्समधील अनेक कंपन्यांची जबाबदारी आहे. यातच आता ईशा थेट टाटा समूहाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. रतन टाटांच्या (ratan tata) स्टारबक्स इंडियाला (starbucks india) टक्कर देण्यासाठी ईशा अंबानीने प्रतिष्ठित ब्रिटीश रेस्टॉरंट चेन प्रेट ए मँगरशी करार केला आहे. 

युनायटेड किंगडममधील कॉफी आणि सँडविच चेन प्रीट ए मँगरने (Pret a Manger) काही आठवड्यांपूर्वी मुकेश अंबानींच्या रिलायन्ससोबत करार केल्यानंतर भारतात आपले पहिले स्टोअर सुरू झाले आहे. हे स्टोअर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये प्रेट अ मॅनेजर स्टोअरचे पहिले स्टोअर उघडले आहे. प्रीट ए मँगर आणि रिलायन्स यांच्यातील करार ईशा अंबानी सांभाळत असलेल्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स ब्रँड्सने केला आहे.

रिलायन्सने भारतात एकूण 10 प्रीट अ मँगर रेस्टॉरंट्स उघडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरुसह मोठ्या शहरांमध्ये हे सुरू होतील. ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेल ब्रँड्सने देशभरातील तरुणांमध्ये चहा आणि कॉफी शॉप्सच्या लोकप्रियतेमुळे भारतात प्रीट ए मँगर स्टोअर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील स्टारबक्स इंडियाला कडवी टक्कर मिळणार आहे.

टॅग्स :रतन टाटामुकेश अंबानीव्यवसायगुंतवणूकमुंबई