Join us

गौतम अदानींच्या ताफ्यात आणखी एक सिमेंक कंपनी; 10422 कोटींमध्ये झाली डील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 19:14 IST

Adani Cement: अदानी समूहाने एका मोठ्या सिमेंट कंपनीचे अधिग्रहण केले आहे.

Adani Cement : अदानी समूहाचे ( Adani Group) प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) गेल्या काही वर्षांपासून सिमेंट क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवत आहेत. यापूर्वी त्यांनी अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) सह अनेक छोट्या-छोट्या सिमेंट कंपन्या खरेदी केल्या होत्या. आता त्यांनी पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड (Penna Cement Industries Limited) खरेदी करण्याची घोषणा केली आहे. 

अदानी ग्रुपच्या मालकीच्या अंबुजा सिमेंटने 10.422 कोटी रुपयांमध्ये पेन्ना सिमेंट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीनंतर अंबुजा सिमेंटची वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता 14 मिलियन टनवरुन 89 मिलियन टन होईल.

एक्सचेंज फायलिंगमध्ये खुलासा अंबुजा सिमेंटने स्टॉक एक्सचेंजकडे रेग्यूलेटरी फायलिंगमध्ये या कराराविषयी माहिती दिली. कंपनीने आपल्या फायलिंगमध्ये म्हटले की, 13 जून 2024 रोजी झालेल्या कंपनीच्या बैठकीत बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड (PCIL) मध्ये 100 हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली.

अंबुजा सिमेंटचा शेअर पडलाविशेष म्हणजे, शेअर बाजारात आजचा व्यवहार संपल्यानंतर अंबुजा सिमेंटने या कराराची माहिती दिली. त्यामुळे अंबुजा सिमेंटचा स्टॉक 0.63 टक्के कोसळून 664.50 रुपयांवर बंद झाला. अंबुजा सिमेंटचे मार्केट कॅप 1,63,674 कोटी रुपये आहे.

टॅग्स :अदानीगौतम अदानीव्यवसायगुंतवणूक