Join us  

जगभरात Amul चा डंका, मोठ्या कंपनीला मागे टाकले; बनला सर्वात मोठा फूड ब्रँड....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 7:26 PM

अमूलची ब्रँड व्हॅल्यू 11 टक्क्यांनी वाढून $3.3 अब्ज झाली आहे.

Strongest Food Brand : भारतातील लोकप्रिय फूड अँड ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Amul चा देशासह जगभरात डंका वाजतोय. एका रिपोर्टनुसार, Amul जगातील सर्वात मोठा फूड ब्रँड बनला आहे. ब्रँड फायनान्सच्या रिपोर्टमध्ये या ब्रँडला AAA+ रेटिंग देण्यात आले आहे. कंपनीची ब्रँड व्हॅल्यूदेखील $3.3 बिलियन झाली आहे. कंपनीने मागील वर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या हर्शीज (Hershey's) ला मागे टाकले आहे.

अमूल बनला नंबर वन ब्रँड अमूलचा इतिहास जवळपास 70 वर्षांचा आहे. ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स रिपोर्ट 2024 नुसार, अमूल आता जगातील सर्वात मोठा फूड ब्रँड बनला आहे. ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्सवर त्याचा स्कोअर 100 पैकी 91 आहे. याशिवाय, कंपनीला AAA+ रेटिंग देखील मिळाले आहे. 2023 च्या तुलनेत या वर्षी अमूलची ब्रँड व्हॅल्यू 11 टक्क्यांनी वाढून $3.3 अब्ज झाली आहे. पण, ब्रँड मूल्याचा कंपनीच्या उलाढालीशी काहीही संबंध नाही. 2022-23 या आर्थिक वर्षात अमूलची विक्री 18.5 टक्क्यांनी वाढून 72,000 कोटी रुपये झाली आहे.

मोठ्या ब्रँडला मागे टाकलेब्रँड फायनान्स अहवालात, Amul ला Hershey's सोबत AAA+ रेटिंग देण्यात आले आहे. पण हर्शीचे ब्रँड व्हॅल्यू 0.5 टक्क्यांनी घसरून $3.9 अब्ज झाले आहे. त्यामुळे त्याला यंदाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर टाकण्यात आले आहे. अमूल हा भारतातील दूध बाजारपेठेचा राजा आहे. दूध मार्केटमध्ये कंपनीचा वाटा 75 टक्के, लोणी मार्केटमध्ये 85 टक्के आणि चीज मार्केटमध्ये 66 टक्के आहे.

नेस्ले जगातील सर्वात मौल्यवान फूड ब्रँड या यादीत नेस्लेला (Nestlé) जगातील सर्वात मौल्यवान फूड ब्रँड म्हटले आहे. कंपनीचे बाजारमूल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी घसरले असून, अंदाजे $20.8 अब्जवर आले आहे. $12 अब्ज मुल्यांकनासह Lay's या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. नॉन-अल्कोहोलिक बेव्हरेज क्षेत्रात कोका-कोला पहिल्या क्रमांकावर, तर पेप्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक