Lokmat Money >गुंतवणूक > ₹१०००० च्या गुंतवणूकीनं होईल ₹५५.६१ लाखांची व्यवस्था, सरकार देणार ८.२ टक्के व्याज; पाहा डिटेल्स

₹१०००० च्या गुंतवणूकीनं होईल ₹५५.६१ लाखांची व्यवस्था, सरकार देणार ८.२ टक्के व्याज; पाहा डिटेल्स

पाहा कोणती आहे ही सरकारी स्कीम आणि काय आहेत याचे बेनिफिट्स. या योजनेत सरकार सर्वाधिक व्याज देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 10:40 AM2024-09-06T10:40:59+5:302024-09-06T10:42:23+5:30

पाहा कोणती आहे ही सरकारी स्कीम आणि काय आहेत याचे बेनिफिट्स. या योजनेत सरकार सर्वाधिक व्याज देत आहे.

An investment of rs 10000 will result in an arrangement of rs 55 61 lakhs the government gives 8 2 percent interest start investing ganesh utsav 2024 | ₹१०००० च्या गुंतवणूकीनं होईल ₹५५.६१ लाखांची व्यवस्था, सरकार देणार ८.२ टक्के व्याज; पाहा डिटेल्स

₹१०००० च्या गुंतवणूकीनं होईल ₹५५.६१ लाखांची व्यवस्था, सरकार देणार ८.२ टक्के व्याज; पाहा डिटेल्स

Sukanya Samriddhi Yojana: आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च याची चिंता प्रत्येक पालकाला असतेच. परंतु मुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं सरकारनं एक अल्पबचत योजना सुरू केली आहे. मुलींच्या पालकांसाठी त्यांच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा उत्तम पर्याय आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्कीमची सुरुवात केली होती.

काय आहेत व्याजदर?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यावर सरकार वार्षिक ८.२ टक्के व्याज देत आहे. सुकन्या समृद्धीवरील व्याजदरात दर तिमाहीला सुधारणा केली जाते. अल्पबचत योजनांमध्ये मिळणारा हा सर्वाधिक व्याजदर आहे.

५ वर्षांच्या मुलीसाठी गुंतवणूक

जर तुमची मुलगी ५ वर्षांची असेल आणि दरमहा ८.२% व्याजदरानं १.२ लाख रुपये म्हणजेच महिन्याला १०,०० रुपये गुंतवत असाल तर २१ वर्षांनंतर योजनेतील अंदाजित मॅच्युरिटीची रक्कम सुमारे ५५.६१ लाख रुपये असेल. यात गुंतवलेली रक्कम १७.९३ लाख रुपये असून २१ वर्षांनंतर मिळणारं व्याज ३७.६८ लाख रुपये आहे. जर तुम्ही १,५०,००० रुपये गुंतवले तर, तुमची मॅच्युरिटी अमाउंट ६९.८ लाख रुपये असेल. २२.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज ४७.३ लाख रुपये असेल.

योजनेची माहिती

सुकन्या समृद्धी योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर करसवलत मिळते. या योजनेत केलेली गुंतवणूक कलम ८० सी अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे, ज्याची कमाल मर्यादा १.५ लाख रुपये आहे. या खात्यावर दरवर्षी वाढणारं व्याजही प्राप्तिकर कायद्याच्या कलम १० अन्वये करमुक्त आहे. मॅच्युरिटी/पैसे काढल्यावर मिळणारं उत्पन्नही करमुक्त आहे.

सुकन्या समृद्धी योजनेची एक महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा लॉक-इन कालावधी, जो २१ वर्षांपर्यंत आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलीसाठी वयाच्या ५ व्या वर्षी खातं उघडलं गेलं तर ती २६ वर्षांची झाल्यावर ते मॅच्युअर होईल.

Web Title: An investment of rs 10000 will result in an arrangement of rs 55 61 lakhs the government gives 8 2 percent interest start investing ganesh utsav 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.