Join us  

Anand Mahindra:'माझी सर्वात खराब गुंतवणूक म्हणजे...' आनंद महिंद्रांचे राकेश झुनझुनवालांबाबत मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 6:30 PM

Rakesh Jhunjhunwala: आनंद महिंद्रांनी दिवंगत राकेश झुनझुनवालांच्या एका वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

Trending On Social Media: बिझनेस टायकून आनंद महिंद्रा (Anand Mahindra) अनेकदा ट्विटरवर मजेशीर पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या अनेक पोस्ट इतरांना प्रेरणाही देतात. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची पोस्ट महिंद्रांनी शेअर केली आहे. ट्विटमध्ये आनंद महिंद्रा दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्याबाबत बोलताना दिसत आहेत.

आनंद महिंद्रांनी काय ट्विट केले..?आनंद महिंद्रांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात राकेश झुनझुनवालांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या तब्येतीबाबत केलेले वक्तव्य आहे. त्या पोस्टमध्ये झुनझुनवाला म्हणतात की, 'माझी सर्वात अयोग्य गुंतवणूक त्यांचे आरोग्य आहे. मी प्रत्येकाला त्यांच्या आरोग्यावर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला देईल.' 

आनंद महिंद्रा यांनी फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर राकेश गुंतवणुकीचा सर्वात मौल्यवान आणि फायदेशीर सल्ला दिला. हा सल्ला अब्जावधी किंमतीचा आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी पैसे नाही तर, तुम्हाला तुमची वेळ गुंतवावी लागेल. #SundayThoughts' असे कॅप्शन महिंद्रांनी दिले.

ट्विट व्हायरल महिंद्रा यांचे हे ट्विट खूप वेगाने व्हायरल होत आहे. महिंद्रांच्या या ट्विटला हजारो लोकांनी लाईक आणि शेअर केले आहेत. अनेक लोक महिंद्राच्या बोलण्याने खूप प्रभावित झालेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. झुनझुनवाला यांनी मृत्यूपूर्वी आपल्या खराब प्रकृतीवर भाष्य केले होते.

टॅग्स :आनंद महिंद्राराकेश झुनझुनवाला