Lokmat Money >गुंतवणूक > अनिल अंबानींची संरक्षण कंपनी सैन्यासाठी शस्त्रे तयार करणार; रत्नागिरीत मोठा प्रकल्प उभारणार...

अनिल अंबानींची संरक्षण कंपनी सैन्यासाठी शस्त्रे तयार करणार; रत्नागिरीत मोठा प्रकल्प उभारणार...

Reliance Defence Limited: रिलायन्स डिफेन्स लिमिटेड या प्रकल्पावर 10000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 08:22 PM2024-10-22T20:22:26+5:302024-10-22T20:22:39+5:30

Reliance Defence Limited: रिलायन्स डिफेन्स लिमिटेड या प्रकल्पावर 10000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Anil Ambani's defense company to manufacture weapons for army; A big project will be set up in Ratnagiri | अनिल अंबानींची संरक्षण कंपनी सैन्यासाठी शस्त्रे तयार करणार; रत्नागिरीत मोठा प्रकल्प उभारणार...

अनिल अंबानींची संरक्षण कंपनी सैन्यासाठी शस्त्रे तयार करणार; रत्नागिरीत मोठा प्रकल्प उभारणार...

Reliance Infrastructure Share Price : भारतीय उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अनिल यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने जाहीर केले आहे की, त्यांची सबसिडरी कंपनी रिलायन्स डिफेन्स लिमिटेड (Reliance Defence Limited) रत्नागिरीमध्ये स्फोटके (Explosives), दारुगोळा (Ammunition) आणि लहान शस्त्रे तयार (Small Arms) करणारा प्लांट उभारणार आहे.

स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्येरिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितले की, कंपनीला धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी उभारण्यासाठी रत्नागिरीतील वाटड औद्योगिक परिसरात 1000 एकर जमीन देण्यात आली आहे. याच धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी (DADC) मध्ये रिलायन्स डिफेन्स लिमिटेड स्फोटके, दारूगोळा आणि लहान शस्त्रे तयार करण्यासाठी एक प्रकल्प उभारणार आहे.

दारुगोळा श्रेणीत लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर आणि टर्मिनली गायडेड म्यूनिशन (Terminally Guided Munition) सामील आहे. स्मॉल आर्म्स पोर्टफोलिओमध्ये सिव्हिल आणि मिलिट्री एक्सपोर्ट मार्केट्सला टार्गेट केले जाईल. कंपनीने सांगितले की, पुढील 10 वर्षात या प्रोजेक्टवर 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरने सांगितले की, या प्रकल्पासाठी जगातील सहा आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसह संभाव्य संयुक्त उपक्रम प्रस्तावित आहे.

विशेष म्हणजे, रिलायन्सचा नागपूरच्या मिहानमध्ये फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि थेल्स या दोन आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसोबत यशस्वी संयुक्त उपक्रम सुरू आहे. Dassault Reliance Aerospace Limited (DRAL) आणि Thales Reliance Defence Systems (TRDS) त्यांच्या उत्पादनातील 100 टक्के निर्यात करतात. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितले की त्यांच्या उपकंपनीद्वारे कंपनीने 1000 कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत.

Web Title: Anil Ambani's defense company to manufacture weapons for army; A big project will be set up in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.