Join us  

उद्योगपती अनिल अंबानी यांची ईडीकडून चौकशी, पाहा नक्की काय आहे प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 5:07 PM

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी दीर्घकाळापासून आर्थिक संकटात आहेत.

उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची आज परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनीचा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परकीय चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाशी संबंधित हे प्रकरण आहे. वेगवेगळ्या कलमांतर्गत नोंदवण्यात आलेल्या प्रकरणात अनिल अंबानी यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

2020 मध्येही हजर झाले होतेयापूर्वी अनिल अंबानी येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. यादरम्यान अनिल अंबानी यांची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली होती. तेव्हा अंबानींच्या नऊ समूह कंपन्यांनी येस बँकेकडून सुमारे 12,800 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे वृत्त आले होते, त्यामुळेच ईडीने चौकशी केली होती.

आयकर विभागानेही नोटीस बजावलीआयकर विभागानेही अनिल अंबानी यांना ब्लॅक मनी कायद्याअंतर्गत कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. यासोबतच दंडही ठोठावण्यात आला आहे. आयकर विभागाने दोन स्विस बँक खात्यांमध्ये कथितपणे ठेवलेल्या 814 कोटी रुपयांहून अधिक अघोषित निधीवर 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल नोटीस जारी केली होती. मात्र, याविरोधात अनिल अंबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायालयात आहे.

अनिल अंबानी अडचणीतरिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी दीर्घकाळापासून आर्थिक संकटात आहेत. अनिल अंबानींच्या अनेक कंपन्या एकतर विकल्या गेल्या आहेत किंवा विक्रीच्या प्रक्रियेत आहेत. त्याचबरोबर अनिल अंबानींच्या शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या बहुतांश कंपन्यांचे शेअर्सही खाली आहेत. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स नेव्हलचा समावेश आहे.

टॅग्स :अनिल अंबानीव्यवसायरिलायन्सगुंतवणूक