Lokmat Money >गुंतवणूक > SBI गुंतवणूकदारांना अधिक नफा कमावण्याची आणखी एक संधी, विशेष स्कीममध्ये गुंतवणूकीची तारीख वाढली

SBI गुंतवणूकदारांना अधिक नफा कमावण्याची आणखी एक संधी, विशेष स्कीममध्ये गुंतवणूकीची तारीख वाढली

या गुंतवणूक स्कीमवर हमीसह व्याजदर जास्त असल्यानं गुंतवणूकदारांना नफा मिळविण्याची ही चांगली संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:33 PM2023-06-21T15:33:24+5:302023-06-21T15:37:26+5:30

या गुंतवणूक स्कीमवर हमीसह व्याजदर जास्त असल्यानं गुंतवणूकदारांना नफा मिळविण्याची ही चांगली संधी आहे.

Another opportunity for SBI investors to earn more profit the investment date extended in special schemes amrit kalash scheme | SBI गुंतवणूकदारांना अधिक नफा कमावण्याची आणखी एक संधी, विशेष स्कीममध्ये गुंतवणूकीची तारीख वाढली

SBI गुंतवणूकदारांना अधिक नफा कमावण्याची आणखी एक संधी, विशेष स्कीममध्ये गुंतवणूकीची तारीख वाढली

स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) किरकोळ गुंतवणूकदारांना त्यांच्या विशेष एफडी स्कीम 'अमृत कलश' मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. या गुंतवणूक स्कीमवर हमीसह व्याजदर जास्त असल्यानं गुंतवणूकदारांना नफा मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या गुंतवणूक एफडी स्कीमवर स्टेट बँक इतर फिक्स्ड डिपॉझिटच्या तुलनेत सर्वाधिक व्याज दर देते.

स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार विशेष एफडी स्कीम अमृत कलशमध्ये (SBI Amrit Kalash Fixed Deposit) 400 दिवसांच्या कालावधीसह गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 जून निश्चित करण्यात आली होती. यात आता वाढ करून बँकेनं ती 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना अधिक नफा कमावण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

किती मिळतंय व्याज?
स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेनं विशेष एफडी स्कीम अमृत कलशवर सामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतलाय. तर, बँकेनं 400 दिवसांच्या कालावधीसह या FD स्कीमवर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देण्याची घोषणा करण्यात आलीये.

यामध्ये गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर व्याज दिलं जातं. टीडीएस कापूस व्याजाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय मुदतीपूर्वी जर रक्कम काढली तर डिपॉझिटच्या वेळी असलेल्या व्याजदरापासून 0.50 ते 1 टक्के पेनल्टी आकारली जाते.

Web Title: Another opportunity for SBI investors to earn more profit the investment date extended in special schemes amrit kalash scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.