smooth retirement : तुम्ही जर सरकारी नोकरदार आहात आणि तुमच्या निवृत्तीला फक्त एकदोन वर्ष बाकी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अनेकदा निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळण्यास विलंब होतो. अशी परिस्थिती आपल्या सोबत उद्भवू नये यासाठी नोकरीत असतानाच काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग पेन्शन आणि ग्रॅच्युइचे व्यवस्थापन करते. निवृत्तीवेतन लाभांचे वेळेवर वितरण आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवर ग्रॅच्युइटी संदर्भात अनेक अपडेट्स या विभागाने दिले आहेत.
सरकारी गृहनिर्माण मंजुरी (नियम ५५)तुम्ही जर सरकारी निवासस्थानात वास्तव्यास असाल तर तुम्हाला निवृत्तीच्या किमान एक वर्ष आधी तुमच्या निवासस्थानाच्या स्थितीची संपूर्ण माहिती द्यावी लागते. त्यानंतर हे तपशील नो डिमांड सर्टिफिकेट (NDC) जारी करण्यासाठी इस्टेट डायरेक्टोरेटकडे पाठवले जातात. हे प्रमाणपत्र निवृत्तीच्या ८ महिने आधी मिळणे आवश्यक आहे. सरकारी निवासाशी संबंधित तुमच्याकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे हे प्रमाणपत्र आहे.
सेवा अभिलेखांची पडताळणी आणि सुधारणा (नियम ५६ आणि ५७)सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डचा सर्वसमावेशक आढावा निवृत्तीच्या एक वर्ष आधी घेतला जातो. पेन्शन प्रकरणाचे सादरीकरण (नियम ५९ आणि ६०) करावे लागते. विभाग प्रमुखाला संपूर्ण पेन्शन केस फॉरमॅट १० मधील कव्हरिंग लेटरसह वेतन आणि लेखा कार्यालयाकडे पाठवावी लागते. निवृत्त कर्मचाऱ्याकडून पेन्शन फॉर्म मिळाल्यापासून २ महिन्यांच्या आत हे केले पाहिजे.
पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) जारी करणेपेन्शन प्रकरण प्राप्त झाल्यानंतर, लेखाधिकारी आवश्यक पडताळणी आणि तपासण्या पार पाडण्यासाठी प्रक्रियेचे पालन करतात. पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळाल्यापासून एकवीस दिवसांच्या आत CPA पेन्शन पेमेंट ऑर्डरची प्रत जारी करेल आणि पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे पाठवेल. हे सर्व आधीच पूर्ण केले तर निवृत्तीनंतर तुम्हाला कसल्या कटकटीशिवाय पेन्शचा लाभ घेता येईल.