पुष्कर कुलकर्णी
मार्केट A 2 Z भाग - १६
शेअर बाजारात उत्तम कंपन्यांच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवताना नेमकी कोणत्या वेळेस गुंतवावी आणि नेमकी कोणत्या वेळेस काढून नफा वसुली करावी हे ज्ञान अनेकांना अवगत नसते. टेक्निकल टूल्स शिकून त्याच्या आधाराने पोझिशनल ट्रेड करून बऱ्यापैकी नफा मिळविण्याची कला अवगत करता येते. यात एंट्री आणि एक्झिट नेमके कधी करावे हे समजते. या टूल्समध्ये चार्ट पॅटर्न, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) आणि मूव्हिंग ॲव्हरेज कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स (MACD) या तीन टेक्निकल टूल्सचा उपयोग होत असतो. आपल्या डिमॅट अकाउंटवर हे सेट करणे सहज शक्य असते. हे टूल्स वापरताना दैनंदिन (डेली) हा पॅरामीटर सेट करावा. या टूल्समधून शेअरची सपोर्ट पातळी आणि रेझिस्टन्स पातळी समजते आणि त्यातूनच एखाद्या शेअरची चाल वरच्या दिशेने का खालच्या दिशेने हे समजून एंट्री आणि एक्झिट कधी करावे याचा अंदाज येतो. यातून गुंतवणूकदार पोझिशनल ट्रेड करून नफा मिळवू शकतो. उत्तम शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार भावात ॲव्हरेजिंग करण्यासाठीही या टूल्सचा आधार घेऊ शकतात. आज R आणि S पासून सुरु होणाऱ्या दोन चांगल्या शेअर्सविषयी...
रिलायन्स इंडस्ट्रीज लि (RELIANCE)
शेअर बाजारात आहेत आणि रिलायन्सचे नाव माहीत नाही, असा एकही गुंतवणूकदार सापडणार नाही. ऑइल, रिटेल, आणि कॅम्युनिकेशन क्षेत्रातील भारतातील एक अग्रगण्य कंपनी.फेस व्हॅल्यू : रु. १०/- प्रतिशेअरसध्याचा भाव : रु. २४६८/- प्रतिशेअरमार्केट कॅप : रु. १६ लाख ७० हजार कोटीभाव पातळी : वार्षिक हाय रु. २,८५६/- आणि लो रु. १,९८०/-, बोनस शेअर्स : आतापर्यंत चार वेळा दिले आहेत., शेअर स्प्लिट : अद्याप नाहीडिव्हिडंड : मागील डिव्हीडंड रु. ८/- प्रती शेअररिटर्न्स : मागील दहा वर्षांत एकूण सहा पट रिटर्न्स मिळाले आहेत. भविष्यात संधी : उत्तम. कंपनीचा व्यवसाय ऑइल, रिटेल आणि कम्युनिकेशन या आवश्यक विभागात असल्याने उत्तम संधी. तसेच नवीन क्षेत्रात शिरून व्यवसाय उभारणे हा या कंपनीचा हातखंडा आहे.
श्री सिमेंट (SHREECEM)
फेस व्हॅल्यू : रु. १०/- प्रतिशेअरसध्याचा भाव : रु. २४,१४०/- प्रतिशेअरमार्केट कॅप : रु. ८६ हजार कोटी भाव पातळी : वार्षिक हाय रु. २७,९३७/- आणि लो रु. १७,८६५ /-बोनस शेअर्स : अद्याप नाहीशेअर स्प्लिट : अद्याप नाहीरिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत सहा पट रिटर्न्स मिळाले आहेत.डिव्हिडंड : मागील डिव्हीडंड रु. ४५/- प्रती शेअरभविष्यात संधी : सिमेंट ही पायाभूत सुविधा आणि बांधकाम व्यवसायास अत्यावश्यक वस्तू असल्याने कंपनीस व्यवसाय वाढीची उत्तम संधी आहे.
टीप : हे सदर फंडामेंटल्स चांगल्या असणाऱ्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.
पुष्कर कुलकर्णी (pushkar.kulkarni@lokmat.com)
Follow : ww.lokmat.com/author/pushkarkulkarni