Join us  

'करदाते दान कराहेत, भारतात टॅक्स शिक्षा आहे', टॅक्स सिस्टीमवर अशनीर ग्रोव्हर स्पष्ट बोलला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 3:28 PM

'तुम्ही 10 रुपये कमवणार आणि त्यातून 4 रुपये सरकार ठेवून घेणार.'

Ashneer Grover on Income Tax : फिनटेक कंपनी भारतपेचे सह-संस्थापक(BharatPe Co Founder) आणि शार्क टँक कार्यक्रमातून भारतात ओळख निर्माण करणारे अशनीर ग्रोव्हर(Ashneer Grover) आपल्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भारताच्या कर प्रणालीवर (Tax System) भाष्य केले आहे. त्यांचे विधान सामान्यांना आवडणारे असेल, पण सरकारला नक्कीच आवडणार नाही.  काही लोक त्यांच्या वक्तव्याला देशद्रोही ठरवत आहेत, तर काही जण अशनीर बोल योग्य असल्याचे सांगत आहेत. 

काय म्हणाले अशनीर ग्रोव्हर ?

अशनीर एका कार्यक्रमात म्हणाला, 'करदाते देशात दान करत आहेत आणि त्यांना कोणताही लाभ मिळत नाहीये. तुम्हाला माहितये की, मी 10 रुपये कमावणार आणि त्यातील 4 रुपये सरकार ठेवून घेणार आहे. महिन्याचे गणित पाहिले तर गोंधळून जाल. म्हणजेच, तुम्ही 12 महिन्यांपैकी 5 महिने सरकारसाठीच काम करत आहात. आयुष्यात किती वर्ष सरकारसाठी काम करावे लागणार, याचा विचार करा.' 

'तुम्ही पाच महिने सरकारसाठी काम करणार आणि उरलेल्या सात महिन्यातून स्वतःसाठी बचत करावी लागेल. मुलांचे शिक्षण असो, फिरायला जाणे असो किंवा इतर खर्च असो, या सात महिन्यातूनच करावा लागेल. पाच महिन्यांची कमाई स्वाहा होणार, हे आपण सर्वांनी स्विकारलं आहे. ही गोष्ट व्यवसायिकांना त्रासदायक आहे, तो नाराज आहे. पण, तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही. तुमचा TDS कापला जाईल, फॉर्म 16 मिळेल. सरकारकडून जे काही मिळेल, ते घ्या. भारतात टॅक्स शिक्षा आहे. तुम्ही 18 टक्के जीएसटी भरत आहात. म्हणजे सात महिन्यांपैकी दीड महिना कमी झालाय. मग तुम्ही कशासाठी जगत आहात?'

अशनीर ग्रोव्हरचे वक्तव्य ऐकून अनेकांच्या मनात असाच विचार येत असेल की, सरकारला इतका कर भरावा लागतो, पण करदात्यांसाठी सरकारकडून कोणतीही सवलत दिली जात नाही. सरकारच्या योजना करदात्यांच्या पैशावर चालतात. अशनीरच्या वक्तव्याने दोन गट पडले आहेत. काहींच्या मते हे योग्य आहे तर काहींच्या मते हे चुकीचे आहे. 

टॅग्स :करभारतकेंद्र सरकारइन्कम टॅक्स