Join us

पेन्शन देणारी जबरदस्त स्कीम, ₹५००० रुपये मिळवण्यासाठी कोणत्या वयात किती करावी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 2:28 PM

वृद्धापकाळात पेन्शन ही एक महत्त्वाची गरज आहे. याद्वारे प्रत्येक लहान मोठी कामं पूर्ण होण्यासाठी मदत होते.

वृद्धापकाळात पेन्शन ही एक महत्त्वाची गरज आहे. याद्वारे प्रत्येक लहान मोठी कामं पूर्ण होण्यासाठी मदत होते. वृद्धापकाळातील ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकारनं अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana- APY) सुरू केलीये. १८ ते ४० वर्षे वयोगटातील आणि जो टॅक्सपेयर नाही असा कोणताही भारतीय नागरिक सरकारच्या या योजनेत योगदान देऊ शकतो. तुमच्या योगदानानुसार तुम्हाला पेन्शन दिली जाते. तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात दर महिन्याला ५,००० रुपये मिळवायचे असतील, तर यासाठी तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल हे आपण जाणून घेऊ.

१८ ते ३० वर्षांपर्यंत

  • १८ वर्षे वयापासून ४२ वर्षांपर्यंत दरमहा २१० रु
  • १९ वर्षे वयापासून ४१ वर्षांसाठी दरमहा २२८ रु
  • २० वर्षे वयापासून ४० वर्षांसाठी दरमहा २४८ रु
  • २१ वर्षे वयापासून ३९ वर्षांसाठी दरमहा २६९ रु
  • २२ वर्षे वयापासून ३८ वर्षांसाठी दरमहा २९२ रु
  • २३ वर्षे वयापासून ३७ वर्षांसाठी दरमहा ३१८ रु
  • २४ वर्षे वयापासून ३६ वर्षांसाठी दरमहा ३४६ रु
  • २५ वर्षे वयापासून ३५ वर्षांसाठी दरमहा ३७६ रु
  • २६ वर्षे वयापासून ३४ वर्षांसाठी दरमहा ४०९ रु
  • २७ वर्षे वयापासून ३३ वर्षांसाठी दरमहा ४४६ रु
  • २८ वर्षे वयापासून ३२ वर्षांसाठी दरमहा ४८५ रु
  • २९ वर्षे वयापासून ३१ वर्षांसाठी दरमहा ५२९ रु
  • ३० वर्षे वयापासून ३० वर्षांसाठी दरमहा ५७७ रु

३१ ते ४० वर्षे वयापर्यंत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर दरमहा भरावी लागणारी रक्कम आणखी वाढेल.

असं उघडा खातंजर तुम्हालाही या योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी सर्वप्रथम बँकेत बचत खातं सुरू करावं लागेल. जर तुमचं पूर्वीपासूनच खातं असेल तर तुम्हाला या योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. यात नाव, मोबाईल नंबक, बँक अकाऊंट नंबर आणि अन्य माहिती भरा. याशिवाय आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडा. यानंतर तुमची कागदपत्रे व्हेरिफाय केली जातील आणि अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुमचं खातं उघडलं जाईल. 

टॅग्स :निवृत्ती वेतनसरकार