लाइफ इन्शुरन्सच्या नावावर आपण प्रथम एलआयसीचं (LIC) नाव घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का की पोस्ट ऑफिसमध्येही लाइफ इन्शुरन्स सुविधा उपलब्ध आहे? ही सर्वात जुनी लाइफ इन्शुरन्स स्कीम असली तरी बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नाही. ही योजना पोस्टल लाइफ इन्शुरन्स (Postal Life Insurance-PLI) म्हणून ओळखली जाते. ब्रिटीश काळात १ फेब्रुवारी १८८४ रोजी याची सुरुवात झाली. या योजनेंतर्गत ६ योजना चालवल्या जातात, त्यापैकी एक होल लाइफ इन्शुरन्स (Whole Life Assurance-Suraksha) आहे. या योजनेशी संबंधित माहिती आज आपण जाणून घेऊ.
बोनससोबत ५० लाखांचा सम एश्योर्ड
होल लाइफ एश्युरन्स-सुरक्षा पॉलिसी १९ वर्षे ते ५५ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. या योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला बोनससह किमान २०,००० रुपये आणि कमाल ५० लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. यादरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, ही रक्कम त्याच्या वारस किंवा नॉमिनीला जाते.
४ वर्षांनंतर लोन घेण्याची सुविधा
सतत ४ वर्षे पॉलिसी सुरू ठेवल्यानंतर, पॉलिसीधारकाला त्याच्यावर कर्ज घेण्याची सुविधा देखील दिली जाते. जर तुम्ही पॉलिसी दीर्घकाळ चालवू शकत नसाल तर तुम्ही ती ३ वर्षांनी ती सरेंडर करू शकता. पण जर तुम्ही ते ५ वर्षापूर्वी सरेंडर केली तर त्यावर तुम्हाला बोनसचा लाभ मिळणार नाही. ५ वर्षानंतर सरेंडर केल्यावर, विम्याच्या रकमेवर एक प्रमाणात बोनस दिला जातो.
हेदेखील फायदे?
या योजनेत, पॉलिसीधारकाला कर सुटीचा लाभ देखील मिळते. पोस्टल लाइफ इन्शुरन्समध्ये भरलेला प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट म्हणून मिळू शकतो. या प्लॅनमध्ये, तुम्हाला प्रीमियम पेमेंटसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पर्याय दिला जातो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकता.
एवढेच नाही तर, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही या पॉलिसीचे वयाच्या ५९ वर्षापर्यंत एंडोवमेंट एश्युरन्स पॉलिसीमध्ये (Endowment Assurance Policy) रूपांतर देखील करू शकता. परंतु यासाठी काही अटींचं पालन करावं लागेल. याशिवाय, तुम्ही पॉलिसी देशाच्या कोणत्याही भागात हस्तांतरित करू शकता.
कोणाला मिळतो फायदा?
यापूर्वी केवळ सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनाच या पॉलिसीचा लाभ घेता येत होता. परंतु २०१७ नंतर डॉक्टर, अभियंता, वकील, व्यवस्थापन सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, बँकर्स आणि कर्मचारी इत्यादींना पीएलआय अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सर्व पॉलिंसाच लाभ घेण्याची सुविधा देण्यात आलीये. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ती ऑनलाइन खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/pli.aspx या लिंकवर क्लिक करा.