Lokmat Money >गुंतवणूक > Share Market: पेंट्सच्या कंपनीची धमाकेदार एंट्री, ८ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४३ टक्के नफा

Share Market: पेंट्सच्या कंपनीची धमाकेदार एंट्री, ८ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४३ टक्के नफा

डूकोल ऑर्गनिक कंपनीच्या आयपीओचा प्राईस ब्रँड ७८ रुपये होता. त्यामुळे, सुरुवातीला या शेअर्समध्ये गंतवणूक करणाऱ्यांना ४३ टक्के नफा मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:51 PM2023-01-19T13:51:42+5:302023-01-19T13:52:39+5:30

डूकोल ऑर्गनिक कंपनीच्या आयपीओचा प्राईस ब्रँड ७८ रुपये होता. त्यामुळे, सुरुवातीला या शेअर्समध्ये गंतवणूक करणाऱ्यांना ४३ टक्के नफा मिळाला आहे.

Bangla entry of Pentas company, 43 percent profit for investors in 8 days ducol-organics-and-colours-limited-ipo-listed | Share Market: पेंट्सच्या कंपनीची धमाकेदार एंट्री, ८ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४३ टक्के नफा

Share Market: पेंट्सच्या कंपनीची धमाकेदार एंट्री, ८ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४३ टक्के नफा

शेअर बाजार म्हणजे डोकं लावून पैसे गुंतवणूक करणाऱ्यांचा व्यापार आहे. या मार्केटमध्ये येणाऱ्या नव्या कंपन्यांकडे लक्ष देऊन, जुन्या कंपन्यांचे भागभांडवल आणि मार्केटमधील उलाढाल पाहून गुंतवणूक करणे आणि वेळीच नफा कमावून बाहेर पडणे गरजचे असते. जो बाजारातील चढ-उतार समजू शकतो, तोच यशस्वी गुंतवणूकदार ठरतो.  पेंट म्हणजे रंग बनवणाऱ्या डूकोल ऑर्गेनिक अँड कलर्स लिमिटेड या कंपनीच्या आयपीओने शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. कंपनीचे शेअर एनएसईमध्ये ४३.५३ टक्के प्रीमीयमसह १११.९५ रुपयांवर लिस्ट झाले आहेत. 

डूकोल ऑर्गनिक कंपनीच्या आयपीओचा प्राईस ब्रँड ७८ रुपये होता. त्यामुळे, सुरुवातीला या शेअर्समध्ये गंतवणूक करणाऱ्यांना ४३ टक्के नफा मिळाला आहे. कंपनीने आयपीओसाठी लॉट साईज १६०० शेअर्संचा निश्चित केला आहे. म्हणजेच, एका गुंतवणूकदाराला कमीत कमी १,२४,८०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यानुसार, या गुंतवणूकदारांना कंपनीकडून शेअर अलोट झाले आहेत, त्यांना आता रिटर्न लिस्टींगनंतर १.७८ लाख रुपये मिळाले आहेत. मात्र, लिस्टींगच्या काही वेळातच हे शेअर्स खालीही घसरले. त्यामुळे, कंपनीच्या शेअर्सचा भाव कमी होऊन १०६.३५ वर पोहोचला. तरीही, गुंतवणूकादारांना हा नफाच झाला आहे. 

कंपनीच्या आयपीओशी संबंधित काही महत्त्वाचे

कंपनीचा आयपीओ ९ जानेवारी २०२३ रोजी ओपन झाला होता.
कंपनीचा आयपीओ ११ जानेवारी २०२३ रोजी बंद झाला
शेअर्सचे अलॉटमेंट १६ जानेवारी २०२३ रोजी झाले
फेस व्हॅल्यू १० रुपये निश्चित करण्यात आली होती. 
प्राईस बँड ७८ रुपये होती. 
इश्यू साईज ३१.५१ कोटी रुपये होती. 
कंपनी एनएसई आणि एसएमईमध्ये लिस्ट झाली. 
 

Web Title: Bangla entry of Pentas company, 43 percent profit for investors in 8 days ducol-organics-and-colours-limited-ipo-listed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.