Join us  

BANK FD : बंपर रिटर्न्स देणाऱ्या या तीन एफडी स्कीम्स ३० जूनला होणार बंद, सोडू नका कमाईची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 11:30 AM

पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स.

देशातील वाढती महागाई रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या काही महिन्यांत रेपो दरात वाढ केली होती. यानंतर बँकांनी त्यांच्या एफडीचे दर वाढवले. एफडीवरील व्याजदरात गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढ झाली आहे. आता महागाई काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केलेली नाही. अशा स्थितीत आगामी काळात व्याजदर आणखी वाढण्याची शक्यता कमी आहे. 

काही एफडी स्कीम्सनं आपल्या ग्राहकांना बंपर नफा दिला आहे. बंपर परतावा देणाऱ्या या FD स्कीम्स 30 जून 2023 रोजी बंद होणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला नफा कमवायचा असेल तर अजूनही संधी गेलेली नाही. दुसरीकडे काही बँकांनी एफडीच्या दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. पंजाब नॅशनल बँकेनं 1 जून 2023 रोजी FD साठी व्याजदरात कपात केली आहे. 30 जूनला बंद होणार्‍या स्कीम्स कोणत्या आहेत ते आपण पाहू.

इंडियन बँक स्पेशल एफडीइंडियन बँकेची 'Ind Super 400 Days' ही एक विशेष FD स्कीम आहे. यामध्ये लोकांना 7.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज दिले जात आहे. इंडियन बँकेने ही विशेष एफडी स्कीम 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. आता लोकांना त्यात गुंतवणूक करण्याची शेवटची संधी आहे.

SBI अमृत कलशदेशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) अमृत कलश एफडी रिटेल टर्म डिपॉझिट स्कीम या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये बंद होणार आहे. ही स्कीम 30 जूनपर्यंत वैध आहे. SBI अमृत कलश FD योजना 400 दिवसांच्या विशेष कालावधीसह येते. यावर सामान्य लोकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर मिळतो. 

SBI व्ही केयर एफडीएसबीआय व्ही केअर एफडी स्कीम केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ही स्कीम 5 वर्षे ते 10 वर्षांच्या कालावधीसह येते. स्टेट बँक 30 जून 2023 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी व्ही केअर एफडी स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर देत आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकबँकपैसा