सध्या बाजारात गुंतवणूकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, अनेकांना गुंतवणूक तर करायची असते, पण त्यात रिस्क नको असते. अशा स्थितीत बँक एफडी आणि स्मॉल सेव्हिग स्कीम एक उत्तम पर्याय आहे. पण येथेही प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे, या दोन पैकी कोणत्या पर्यायात सर्वाधिक परतावा मिळेल? या दोन्ही पर्यायांत व्याजदर वेगवेगळे असतात.
महत्वाचे म्हणजे, स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये मिळणारे ब्याज हे दर तीन महिन्याला बदलत असते. तर बँक एफडी मध्ये गुंतवणूक करताना जो व्याजदर निश्चित केलेला असतो त्यानुसारच व्याज मिळते. स्मॉल सेव्हिंग स्कीमचा व्याजदर हा देशातील अधिकांश बँकांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्याजदराच्या बरोबरीत असतो. स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये अनेक प्रकारच्या स्कीम आहेत.
बँक एफडी -
बँक एफडीमध्ये एका निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. जर आपली एफडीमध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल तर, 6 महिने, 3 वर्षे अथवा 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. एफडीमध्ये बँकेकडून वार्षिक व्याजदर रिव्हाइज केला जातो. जो एफडीचा कालावधी आणि गुंतवणूकदाराच्या वयाच्या आधारे ठरवला जातो.
सध्या एचडीएफसी बँक 7.75 टक्के एढा व्याजदर देत आहे. तसेच, आयसीआयसीआय बँक 7.60 टक्के एवढा वार्षिक व्याजदर देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 7.50 टक्के एवढा व्याजदर देत आहे.
स्मॉल सेव्हिंग स्कीम व्याजदर -
स्मॉल सेव्हिंग स्कीमसाठी जानेवारी-मार्च 2024 चा व्याजदर अपडेट करण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे -
1 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिटवर 6.9 टक्के
2 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिटवर 7 टक्के
3 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिटवर 7.1 टक्के
5 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिटवर 7.5 टक्के
5 वर्षाच्या रिक्योरिंग डिपॉजिटवर 6.7 टक्के
नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 7.7 टक्के
किसान विकास पत्रात 7.5 टक्के व्याजदर मिळतो. ही स्कीम 115 महिन्यांनंतर मॅच्योर होते.
पब्लिक प्रोव्हिडन्ट फंडमध्ये 7.1 टक्के
सुकन्या समृद्धी अकाउंटमध्ये 8.2 टक्के
सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीममें 8.2 टक्के
मंथली इनकम अकाउंटवर 7.4 टक्के