Lokmat Money >गुंतवणूक > Post Officeची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे जमा करा; दर महिन्याला कमाई, पाहा ₹५ लाखांचं गणित

Post Officeची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे जमा करा; दर महिन्याला कमाई, पाहा ₹५ लाखांचं गणित

पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम या छोट्या बचतीतून खात्रीशीर कमाई करून देण्यासाठी अतिशय उत्तम आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 01:28 PM2023-11-27T13:28:51+5:302023-11-27T13:30:12+5:30

पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम या छोट्या बचतीतून खात्रीशीर कमाई करून देण्यासाठी अतिशय उत्तम आहेत.

beneficial scheme of Post Office Deposit once Earn every month See the math of rs 5 lakh know details | Post Officeची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे जमा करा; दर महिन्याला कमाई, पाहा ₹५ लाखांचं गणित

Post Officeची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे जमा करा; दर महिन्याला कमाई, पाहा ₹५ लाखांचं गणित

Post Office monthly income scheme (POMIS): पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम या छोट्या बचतीतून खात्रीशीर कमाई करून देण्यासाठी अतिशय उत्तम आहेत. यापैकी एका सुपरहिट योजनेत एकदा पैसे जमा केले की दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळते. ही योजना पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) आहे. पोस्ट ऑफिस एमआयएसमध्ये सिंगल आणि जॉईंट खाती उघडता येतात. एमआयएस खात्यात एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्याची मॅच्युरिटी खातं उघडल्यापासून पुढील ५ वर्षांसाठी असते. या योजनेतील गुंतवणूकीवर १ ऑक्टोबर २०२३ पासून ७.४ टक्के वार्षिक व्याज देत आहे.

मासिक उत्पन्न कसे ठरवले जाते?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही सिंगल अकाऊंटमध्ये ९ लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटमध्ये १५ लाख रुपये जमा करू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुमची एकूण मूळ रक्कम ५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर परत मिळेल. परंतु त्याच वेळी, ते आणखी ५-५ वर्षांसाठी वाढवलं जाऊ शकते. दर ५ वर्षांनी, मूळ रक्कम काढण्याचा किंवा योजनेला मुदतवाढ देण्याचा पर्याय असेल. खात्यावर मिळणारं व्याज दर महिन्याला तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केलं जाईल.

५ लाखांवर किती परतावा
पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये उत्पन्नाची हमी दिली जाते. जर तुम्ही ५ लाख रुपये जमा केले असतील, या स्कीमनुसार यावर ७.४ टक्के वार्षिक व्याज दिलं जातं. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ३,०८३ रुपयांचं उत्त्पन्न मिळेल. १२ महिन्यांत ही रक्कम ३६,९९६ रुपये असेल.

डिपॉझिटच्या तारखेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यातील रक्कम काढू शकता. जर एक ते तीन वर्षांच्या दरम्यान तुम्ही पैसे काढले,तर डिपॉझिट अमाऊंटच्या २ टक्के रक्कम कापून ती परत केली जाते. जर ३ वर्षांनंतर मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढले तर जमा रकमेच्या १ टक्के रक्कम कापून पैसे परत केले जातात.

Web Title: beneficial scheme of Post Office Deposit once Earn every month See the math of rs 5 lakh know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.