Join us

₹१.५ लाखांपर्यंत वार्षिक कर बचतीचा फायदा, जाणून घ्या PPF स्कीममध्ये काय आहे खास? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 1:32 PM

₹१.५ लाखांपर्यंत वार्षिक कर बचतीचा फायदा, जाणून घ्या PPF स्कीममध्ये काय आहे खास? 

Tax Savings in FY25, PPF: नवीन आर्थिक वर्ष 2024-25 सुरू झालं आहे. करदात्यांनी, विशेषत: नोकरी करणाऱ्या लोकांनी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर बचतीला सुरुवात करणं आवश्यक आहे. कर वाचवण्याचा एक लोकप्रिय पर्याय म्हणजे पीपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. ही दीर्घकालीन मॅच्युरिटीची अल्प बचत योजना आहे.  

या योजनेत करदाते कलम 80C अंतर्गत दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंतचा कर कपातीचा दावा करू शकतात. याशिवाय या योजनेत इतर मार्गांनीही कर वाचवला जातो. सध्या देशात दोन प्रकारच्या कर प्रणाली आहेत. नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली. कलम 80C चा लाभ जुन्या कर प्रणालीमध्येच मिळू शकतो. चला जाणून घेऊया योजनेची माहिती... 

सुरक्षित रिटर्न 

केंद्र सरकार लोकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ. लोक या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करतात आणि त्यांच्या भविष्यासाठी पैसे जमा करतात. याद्वारे कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळू शकतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्षभरात जास्तीत जास्त ५ लाख रुपये जमा करता येतात. पाच तारखेनंतर जमा केलेल्या पैशांवर पुढील महिन्यात व्याज मिळेल. तसंच पाच तारखेपर्यंत केलेली रक्कम त्याच महिन्याच्या व्याजात गणली जाईल. एखादी व्यक्ती केवळ एकदाच पीपीएफ खातं उघडू शकते. 

टॅक्स सेव्हिंगचा पर्याय 

पीपीएफवर कर बचतीचा मोठा फायदा होतो. हे EEE श्रेणी अंतर्गत येते (एक्झम्प्ट, एक्झम्प्ट, एक्झम्प्ट). याचा अर्थ मुद्दल रक्कम, मॅच्युरिटी रक्कम तसंच कमावलेले व्याज यावर कर आकारला जात नाही. ज्या करदात्यांनी जुन्या कर प्रणालीची निवड केली आहे ते पीपीएफ अंतर्गत कर लाभ घेऊ शकतात. १ जानेवारी २०२४ पासून, पीपीएफचा व्याज दर वार्षिक ७.१% आहे.  

आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, एका आर्थिक वर्षात पीपीएफमध्ये जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांच्या ठेवीवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. म्हणजेच या योजनेंतर्गत दरवर्षी तुम्ही तुमच्या उत्पन्नातून १.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता. तुम्ही १५ वर्षांसाठी त्याचा लाभ घेऊ शकता. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीगुंतवणूक