Join us

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच लागू होणार Bullion Hallmarking; काय होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 3:04 PM

Gold Bullion Hallmarking : तुम्ही सणासुदीला सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरकार लवकरच बुलियन हॉलमार्किंग अनिवार्य करू शकते.

Gold Bullion Hallmarking : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याला झळाली मिळाली आहे. आज सोने ऐतिहासिक किमतीवर पोहचलं आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक झाल्यानंतर आता नवीन वर्षापासून बुलियन हॉलमार्किंगही अनिवार्य होऊ शकते. देशभरात टप्प्याटप्प्याने गोल्ड बुलियन हॉलमार्किंग लागू केले जाईल. त्यामुळे ग्राहक म्हणून तुम्हालाही याबाबत माहिती हवी.

बुलियन हॉलमार्किंगच्या उपसमितीने या प्रकरणी आपला अहवाल सादर केला आहे. या वर्षाच्या अखेरीस सर्व भागधारक आणि प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. डिसेंबरपूर्वी अंतिम भागधारकांशी चर्चा करून नियम निश्चित केले जातील. चांदी आणि कलाकृतींसाठी हॉलमार्किंगची चर्चा देखील अंतिम टप्प्यात आहे. गोल्ड बुलियन, दागिन्यांच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो. दागिन्यांमध्ये शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे.

काय होणार फायदा?सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी बुलियन हॉलमार्किंग खूप आवश्यक आहे. यावर खूप काळापासून विचारविनिमय सुरू आहे. गोल्ड बुलियन हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यानंतर, त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रिफायनर्सना आयात केलेल्या सोन्याची गुणवत्ता कळेल. सोन्याची शुद्धता यामुळे कळेल. ग्राहकांना गुणवत्तेच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. हॉलमार्क केलेला सराफा देशात बनवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता सुनिश्चित करण्यात मदत करेल.

हॉलमार्किंग म्हणजे काय?सोन्याची शुद्धता प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेला गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking)म्हणतात. हे गुणवत्ता प्रमाणपत्रासारखे आहे. सरकारने सोन्याच्या शुद्धतेचे मापदंड ठरवून दिले आहेत, त्यानुसार बाजारात सोने उपलब्ध आहे. हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये BIS लोगो, शुद्धता ग्रेड आणि ६ अंकी अल्फान्यूमेरिक कोड पाहायला मिळतो. 

टॅग्स :सोनंगुंतवणूकचांदी