EPFO Higher Pension Scheme: एम्प्लॉईज पेन्शन स्कीम (EPS) अंतर्गत, सेवानिवृत्तीच्या वेळी ईपीएफओकडून अधिक पेन्शन मिळविण्यासाठी एक हायर पेन्शन स्कीम सुरू करण्यात आली होती, ज्या अंतर्गत वेतन तपशील इत्यादी अपलोड करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ होती. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं बुधवारी ही मुदत आता पाच महिन्यांनी वाढवण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. योजनेसाठी अर्ज करणार्या कर्मचार्यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी एम्प्लॉयर्सना ३१ मे २०२४ पर्यंत वेळ आहे.यापूर्वी वाढवलेली अंतिम मुदत४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, हायर पेन्शन स्कीम २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू करण्यात आली, जी पूर्वी केवळ ३ मे २०२३ पर्यंत होती. दरम्यान, पेन्शनधारक आणि सदस्यांची मागणी लक्षात घेऊन, त्याची अंतिम मुदत २६ जून २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. नंतर ती आणखी १५ दिवसांसाठी म्हणजे ११ जुलै २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. आतापर्यंत, EPFO ला निवृत्तीवेतनधारक आणि सदस्यांकडून एकूण १७.५९ लाख अर्ज मिळाले होते.
३१ डिसेंबरपर्यंत मुदतएम्पलॉयर आणि एम्पलॉयर संघटनांच्या वतीनं, ईपीएफओला त्यांना पेन्शनधारक आणि सदस्यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती करण्यात आली होती. म्हणून, ती मुदत प्रथम ३० सप्टेंबर २०२३ आणि नंतर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली.एम्पलॉयरकडे अद्याप ३.६ लाखांहून अधिक अर्ज प्रोसेस होण्यासाठी शिल्लक आहेत. हे पाहता, वेतन तपशील ऑनलाइन अपलोड करण्यासाठी ईपीएफओनं ३१ मे २०२४ पर्यंत अतिरिक्त वेळ दिला आहे.