Join us

बंपर नफा कमवून बिन्नी बन्सल 'Flipkart' मधून बाहेर; भागीदारी वॉलमार्टला विकली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 5:46 PM

उर्वरित गुंतवणूकदारचांही कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय.

Flipkart: एका खोलीतून कंपनीची सुरुवात करुन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'फिल्पकार्ट'ला सर्वोच्च उंचीवर नेणाऱ्या बन्सल ब्रदर्सचे पर्व संपले आहे. सचिन बन्सल यांच्यानंतर बिन्नी बन्सल यांनीही फ्लिपकार्टमधील आपला उर्वरित हिस्सा विकला आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल आणि कंपनीचे सुरुवातीचे गुंतवणूकदार Accel आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंटने वॉलमार्टला त्यांचा हिस्सा विकून ई-कॉमर्स कंपनीतून पूर्णपणे बाहेर पडले आहे.

वॉलमार्टने 2008 मध्ये कंपनीचा हिस्सा विकत घेतला होता, तेव्हा Accel आणि Tiger Global Management कडे सुरुवातीला Flipkart मधील 20 टक्क्यांहून अधिक भागभांडवल होते. परंतु 2018 मध्ये वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्यापूर्वी हळूहळू त्यांनी त्यांची हिस्सेदारी सुमारे 6 टक्क्यांपर्यंत कमी केली. 

वॉलमार्टने 2018 मध्ये फ्लिपकार्टमधील कंट्रोलिंग स्टेक विकत घेतला. अधिग्रहणानंतरही अ‍ॅक्सेलने अगदी आतापर्यंत कंपनीतील 1.1 टक्के हिस्सा राखून ठेवला. 2023 मध्ये एक्सेल कंपनीतून बाहेर पडली आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांत सुमारे $60-80 दशलक्ष गुंतवणुकीवर 25-30 पट परतावा दिला आहे.

वॉलमार्टच्या अधिग्रहणानंतर टायगर ग्लोबलचीदेखील फ्लिपकार्टमध्ये कमी भागीदारी होती, परंतु वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार सुमारे $3.5 अब्ज नफा घेतल्यानंतर आता टायगर ग्लोबल बाहेर पडली आहे. Flipkart सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी आधीच 2018 मध्ये वॉलमार्टला त्यांचे संपूर्ण स्टेक विकले होते, तर त्यांचे भागीदार आणि सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टमधील एक छोटासा स्टेक कायम ठेवला होता. 

टॅग्स :फ्लिपकार्टव्यवसायगुंतवणूकपैसा