Lokmat Money >गुंतवणूक > संपूर्ण जग 'या' व्यक्तीच्या मुठीत! Apple, Google अन्...सगळ्यांच्या चाव्या त्यांच्याकडे

संपूर्ण जग 'या' व्यक्तीच्या मुठीत! Apple, Google अन्...सगळ्यांच्या चाव्या त्यांच्याकडे

या व्यक्तीने 1988 मध्ये कंपनी स्थापन केली आणि आज जगातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:08 PM2023-07-18T16:08:05+5:302023-07-18T16:09:35+5:30

या व्यक्तीने 1988 मध्ये कंपनी स्थापन केली आणि आज जगातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी झाली.

BlackRock Inc. Larry Fink: larry fink md and ceo of blackrock who controls worlds wealth | संपूर्ण जग 'या' व्यक्तीच्या मुठीत! Apple, Google अन्...सगळ्यांच्या चाव्या त्यांच्याकडे

संपूर्ण जग 'या' व्यक्तीच्या मुठीत! Apple, Google अन्...सगळ्यांच्या चाव्या त्यांच्याकडे

BlackRock Inc. Larry Fink: अमेरिकेतील मल्टीनॅशनल इनव्हेस्टमेंट कंपनी ब्लॅकरॉक इंक (BlackRock Inc.) जगातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजमेंट (मालमत्ता व्यवस्थापन) कंपनी आहे. जून तिमाहीत कंपनीचे अॅसेट अंडर मॅनेजमेंट 9.43 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मागील तिमाहीच्या तुलनेत ती चार टक्क्यांनी वाढली आहे. हे भारताच्या जीडीपीच्या जवळपास तिप्पट आणि अमेरिकेच्या जीडीपीच्या निम्मे आहे.

ब्लॅकरॉकच्या स्थितीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, ही कंपनी जगातील एकूण शेअर्स आणि बाँड्सपैकी 10 टक्के शेअर्स हाताळते. ही जगातील सर्वात मोठी शॅडो बँक आहे. आज संपूर्ण जग या कंपनीच्या ताब्यात आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण, जगातील प्रत्येक मोठ्या कंपनीत या ब्लॅकरॉकचा मोठा वाटा आहे.

जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या Apple मध्ये ब्लॅकरॉकची 6.5 टक्के भागीदारी आहे. यासोबतच, व्हेरिझॉन आणि फोर्डमध्ये 7.25 टक्के, फेसबुकमध्ये 6.5 टक्के, वेल्स फार्गोमध्ये 7 टक्के, जेपी मॉर्गनमध्ये 6.5 टक्के, डच बँकेत 4.8 टक्के आणि गुगलची मूळ कंपनी Alphabet Inc मध्ये 4.48 टक्के हिस्सेदारी आहे. विशेष म्हणजे, भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही ब्लॅकरॉकचा हिस्सा आहे. यावरुन ब्लॅकरॉक कंपनी किती शक्तिशाली आहे, याची कल्पना येऊ शकते.

कशी झाली सुरुवात?
कंपनीची स्थापना लॅरी फिंक(Larry Fink) यांनी 1988 मध्ये केली होती. फिंक हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. फिंकने राज्यशास्त्राचा अभ्यास केला होता, पण पैसे कमवण्याच्या मोहात शेअर बाजारात प्रवेश केला. त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी बोस्टन डायनॅमिक्समधून करिअरला सुरुवात केली. डेट सिंडिकेशन सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. वयाच्या 31 व्या वर्षी ते बँकेचे एमडी झाले.

एका वर्षात त्यांनी बँकेला एक अब्ज डॉलर्स कमवून दिले. फिंक यांनी अधिक जोखीम घेण्यास सुरुवात केली, परंतु एका तिमाहीत बँकेने $100 मिलियन गमावले. त्यामुळे बँकेने त्यांना कार्यमुक्त केले. 1988 मध्ये वयाच्या 35 व्या वर्षी त्यांनी स्वतःची कंपनी उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रसिद्ध गुंतवणूकदार स्टीव्ह श्वार्झमन यांनी त्यांना मदतीचा हात दिला. 

स्टीव्हची कंपनी ब्लॅकस्टोनने फिंकसोबत भागीदारी केली आणि $5 मिलियन गुंतवणूक केली. फिंकला GE ने सुरुवातला काही मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी दिल्या होत्या. फिंकने यात उत्तम काम केले. मग त्यांची गाडी पुढे जाऊ लागली. पाच वर्षांत कंपनीचे अॅसेट अंडर मॅनेजमेंट $ 20 अब्ज पोहोचले. नंतर फिंक आणि स्टीव्ह यांच्यात मतभेद झाले आणि फिंकने स्वतःची स्वतंत्र कंपनी ब्लॅकरॉक स्थापन केली. यानंतर फिंक यांनी मागे वळून पाहिले नाही. आज, BlackRock जगभरातील कंपन्या आणि सरकारांची मालमत्ता व्यवस्थापित करते. यामध्ये पेन्शन फंडाचाही समावेश आहे.

Web Title: BlackRock Inc. Larry Fink: larry fink md and ceo of blackrock who controls worlds wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.