BSNL Vs VI : टाटा कंपनीचा सपोर्ट मिळाल्यानंतर भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलला सुगीचे दिवस आले आहेत. लोक भराभर आपले मोबाईल नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहेत. खाकरुन बीएसएनएल त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी लोकप्रिय आहे. तर दुसरीकडे व्होडाफोन आयडिया आपल्या चांगल्या नेटवर्कसाठी प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या १८० दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये कोणती कंपनी तुम्हाला चांगले फायदे देत आहेत? तुमच्यासाठी बेस्ट कोणतं? चला पाहुया.
तुम्हाला बीएसएनएलचा १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ८९७ रुपयांमध्ये खरेदी करावा लागेल. बीएसएनएल व्यतिरिक्त, व्हीआय त्यांच्या वापरकर्त्यांना १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. व्हीआयच्या या प्लॅनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, व्हीआयचा १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन १७४९ रुपयांना येतो. यामध्ये बीएसएनलचा प्लॅन स्वस्त आहे. पण, फायदे कोण चांगलं देतंय, तेही पाहुया.
बीएसएनएलचा १८० दिवसांच्या वैधतेचा प्लॅनबीएसएनएलचा ८९७ रुपयांचा प्लॅन १८० दिवस म्हणजेच ६ महिन्यांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित मोफत कॉलिंगचा फायदा मिळतो. यासोबतच, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळतो. डेटाबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त ९० जीबी डेटा म्हणजेच दररोज ५०० एमबी डेटा मिळतो.
व्हीआयच्या प्लॅनमध्ये काय मिळतंय?तुम्ही १८० दिवसांच्या वैधतेसह व्हीआयचा प्लॅन १७४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित मोफत कॉलिंगचा फायदा मिळतो. यासोबतच, तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळतो. डेटाबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटाचा फायदा मिळेल. यासोबतच, तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईटचाही फायदा मिळेल.
वाचा - तुम्हाला UAN मिळवण्यासाठी एचआरच्या पाया पडण्याची गरज नाही; तुम्ही स्वतः करा जनरेट
तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?तुम्हाला डेटाची फार गरज लागत नसेल तर तुमच्यासाठी बीएसएनएलचा प्लॅन बेस्ट आहे. पण, जर तुम्ही दररोज १ जीबीपेक्षा जास्त डेटा वापरत असाल तर तुम्हाला व्हीआय जास्त परवडेल.