Join us

Budget 2023 | महाराष्ट्रातील रेल्वेसाठी घसघशीत तरतूद; २००९ ते २०१४ च्या अकरा पट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 1:21 PM

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे...

पुणे :रेल्वे विभागाला यंदाच्या अर्थसंकल्पात मिळालेल्या २.४० लाख काेटी रुपयांच्या निधीनंतर राज्याला नेमका किती निधी मिळाला, याची चर्चा रंगत होती. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यातील पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधत २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५३९ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे सांगितले. २००९ ते २०१४ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी सरासरी दिल्या जाणाऱ्या १ हजार १७१ कोटी रुपये वाटपाच्या जवळपास ११ पट अधिक असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे...

- २०२३-२४ साली मध्य रेल्वेसाठी एकूण योजना खर्च १० हजार ६०० कोटी. (२०२२-२३ मध्ये मध्य रेल्वेला ७ हजार २५१ कोटी मिळाले होते.)

- यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी एकूण परिव्यय १३ हजार ५३९ कोटी आहे. हा २००९-२०१४ मधील महाराष्ट्राच्या सरासरी परिव्ययापेक्षा जवळपास ११ पटीपेक्षा अधिक आहे, जो प्रतिवर्ष १ हजार १७१ कोटी होता.

नवीन लाइनसाठी १ हजार ६८५ कोटींचा निधी :

- अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ - २५० किमी साठी २०१ कोटी

- वर्धा-नांदेड मार्गे यवतमाळ पुसद - २७० किमी साठी ६०० कोटी

- सोलापूर-उस्मानाबाद मार्गे तुळजापूर - ८४ किमी साठी ११० कोटी

- धुळे-नरडाणा - ५० किमी साठी १०० कोटी

- कल्याण-मुरबाड मार्गे उल्हासनगर - २८ किमी साठी १०० कोटी

- बारामती-लोणंद - ५४ किमीसाठी १०० कोटी

- फलटण-पंढरपूर - १०५ किमी साठी २० कोटी

गेज रूपांतरण...

- पाचोरा-जामनेर - ८४ किमी साठी ५० कोटी

दुहेरीकरण / ३ री लाइन / ४ थी लाइन – एकूण २ हजार ७०२ कोटी

- कल्याण-कसारा ३ री लाइन - ६८ किमी साठी ९० कोटी

- वर्धा-नागपूर ३ री लाइन - ७६ किमी साठी १५० कोटी

- वर्धा-बल्हारशाह ३ री लाइन - १३२ किमी साठी ३०० कोटी

- इटारसी-नागपूर शिल्लक - २८० किमी साठी ३१० कोटी

- पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण - ४६७ किमी साठी ९०० कोटी

- दौंड-मनमाड दुहेरीकरण - २४७ किमी साठी ४३० कोटी

- वर्धा-नागपूर ४ थी लाइन - ७९ किमी साठी १५० कोटी

- मनमाड-जळगाव ३ री लाइन - १६० किमी साठी ३५० कोटी

- जळगाव-भुसावळ ४ लाइन - २४ किमी साठी २० कोटी

वाहतूक सुविधा आणि इतर कामांसाठी एकूण १७३ कोटी रुपये :

- पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनस फेज-१ टप्पा-१ - १० कोटी

- सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्र. १०, ११, १२, १३ चा २४ डब्यांसाठी विस्तार - १० कोटी

- पुणे २४/२६ डब्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार - २५ कोटी

रस्ता सुरक्षा कामे – रोड ओवर ब्रिज / रोड अंडर ब्रिज - एकूण ६९५ कोटी

- विक्रोळी आरओबी - ४ कोटी

- दिवा आरओबी - ५ कोटी

- बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा - ४० कोटी

- रत्नागिरी रोलिंग स्टॉक घटक कारखाना - ८२ कोटी

- ग्राहक सुविधा - ७७६ कोटी

- ट्रॅक नूतनीकरण - १४०० कोटी

- पुलाचे काम, बोगद्याचे काम - ११३ कोटी

- सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनची कामे - २३७ कोटी

टॅग्स :पुणेरेल्वेमहाराष्ट्रअर्थसंकल्प 2023