मुंबई - जर तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये कुठलाही व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला जो व्यवसाय सांगणार आहोत. त्यामध्ये कमी गुंतवणुकीसह कमाईची चांगली संधी आहे. या व्यवसायामधून तुम्ही दरमहा १० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. हा कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय असला तरी यामधील नफा तुम्हाला खूश करणारा असेल. हा व्यवसास कृषी क्षेत्राशी संबंधित आहे.
मशरूमची शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे. यामध्ये गुंतवणुकीपेक्षा १० पटीपर्यंत फायदा मिळू शकतो. याचा अर्थ १ लाख रुपये गुंवतवून तुम्ही १० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये मशरूमच्या शेतीची मागणी वाढली आहे.
या शेतीसाठी काय करावं लागतं, त्याबाबत जाणून घेवूयात. सध्या बटन मशरूमची मागणी सर्वाधिक आहे. ते तयार करण्यासाठी ते तयार करण्यासाठी गहू किंवा तांदळाच्या भुशाचा वापर केला जातो. कंपोस्ट खत तयार होण्यामध्ये एका महिन्याचा वेळ लागतो. त्यानंतर कुठल्याही पृष्ठभागावर ६ ते ८ इंच वाफा अंथरून मशरूपचे बी लावले जाते. त्यानंतर हे बी कंपोस्टने झाकले जाते. ४० ते ५० दिवसांनंतर हे मशरूम कापून विकण्यायोग्य बनतात. मशरूमच्या शेतीसाठी तुम्हाला शेड असलेल्या जागेची आवश्यकता भासते.
मशरुमची शेती १ लाख रुपयांपासून सुरू करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. एक किलो मशरूमच्या उत्पादनासाठी २५ ते ३० रुपये खर्च येतो. तर बाजारामध्ये हे मशरूम २५० ते ३०० रुपये किलोने विकले जातात. तसेच मोठ्या हॉटेलमध्ये चांगल्या दर्जाच्या मशरूमचा पुरवठा केल्यास ५०० रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो.