Join us  

१ ग्राम सोनं खरेदी करा, २.५० टक्के व्याज मिळवा; तुफान आहे मोदी सरकारची स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 2:27 PM

धनत्रयोदशीच्या प्रसंगी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. वास्तविक, बहुतेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात.

Dhanteras 2023: आता दिवाळी जवळ येतेय. धनत्रयोदशीच्या प्रसंगी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. वास्तविक, बहुतेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत डिजिटल सोन्याची मागणीही वाढली आहे. तुम्ही डिजिटल पद्धतीनं सोन्यात गुंतवणूक करून सरकारकडून व्याजही मिळवू शकता. यासाठी एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) किंवा सॉवरन गोल्ड बाँड (एसजीबी) इत्यादीद्वारे सोने खरेदी करता येतं. आज आम्ही तुम्हाला सॉवरन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) बद्दल सांगणार आहोत. या योजनेत गुंतवणुकीवर तुम्हाला सोन्याची सुरक्षा आणि शुद्धता तर मिळेलच पण सरकारकडून व्याजही मिळेल.सॉवरेन गोल्ड बॉन्डकेंद्र सरकारनं २०१५ मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. ही सोन्याची खरेदी एक गुंतवणूक आहे, ज्यावर व्याज मिळते. केंद्र सरकार वेळोवेळी सर्वसामान्यांना या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी देते. या अंतर्गत तुम्ही एक ग्रॅम ते ४ किलोपर्यंत सोनं खरेदी करू शकता. त्याची किंमत रिझर्व्ह बँक ठरवते.साधारणपणे या सोन्याची किंमत सर्वसामान्य बाजारापेक्षा स्वस्त असते. डिजिटल पद्धतीने पेमेंट केल्यास यावर ५० रुपये प्रति ग्रॅमची सूटही मिळेल. हे सोने बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), एनएसई आणि बीएसईसारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून खरेदी केले जाऊ शकतं.किती आहे व्याज?हे बॉन्ड आठ वर्षांच्या कालावधीसाठी असतात. म्हणजे याचा मॅच्युरिटी कालावधी आठ वर्षांच्या कालावधीत येतो. दरम्यान, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वर्षांत यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सरकारनं गुंतवणुकीवर २.५० टक्के वार्षिक व्याज निश्चित केलं आहे. व्याज अर्धवार्षिक अंतरानं दिलं जातं.

टॅग्स :सोनंसरकार