Lokmat Money >गुंतवणूक > संकटात अडकलेल्या काळात Byju ने रणनीती बदलली; कोर्स फी कमी केली

संकटात अडकलेल्या काळात Byju ने रणनीती बदलली; कोर्स फी कमी केली

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या Byjuने आता आपली रणनीती बदलली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 07:59 PM2024-05-09T19:59:47+5:302024-05-09T20:00:42+5:30

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या Byjuने आता आपली रणनीती बदलली आहे.

Byju changed strategy; Course fee reduced, salary of employees also changed | संकटात अडकलेल्या काळात Byju ने रणनीती बदलली; कोर्स फी कमी केली

संकटात अडकलेल्या काळात Byju ने रणनीती बदलली; कोर्स फी कमी केली

Byju crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या Byjuने आता आपली रणनीती बदलली आहे. लिक्विडिटीचा अभाव आणि कायदेशीर आव्हाने असताना, बायजूने आता आपल्या कोर्सेसच्या किमतीत मोठी कपात केली आहे. Byju ने आपल्या कोर्सेसच्या किमती 30-40% ने कमी केल्या आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या सेल्स स्टाफच्या पगार रचनेतदेखील बदल करण्याची घोषणा केली आहे.

कोर्स फी कमी केल्या. 
मीडिया रिपोर्टनुसार, Byju च्या लर्निंग ॲपची वार्षिक फी आता ₹12000 मध्ये उपलब्ध असेल. तसेच, Byju's Classes आणि Byju's Tuition Center (BTC) मध्ये संपूर्ण वर्षाची फी अनुक्रमे ₹24000 आणि ₹36000 असेल. बायजूने आपल्या सेल्स ऑफिसरच्या पगार रचनेतही बदल सुचवले आहेत. गेल्या महिन्यात बायजूचे इंडिया सीईओ अर्जुन मोहन यांनी राजीनामा दिला होता. यानंतर संस्थापक आणि ग्रुप सीईओ बायजू रवींद्रन यांनी पदभार स्वीकारला आणि तेच नियमित काम पाहत आहेत. तेव्हा रवींद्रन म्हणाले होते की, ही पुनर्रचना बायजू 3.0 ची सुरुवात आहे.

6 जून रोजी सुनावणी होणार 
दरम्यान, बायजूच्या गुंतवणूकदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) राइट्स इश्यूद्वारे उभारलेल्या निधीच्या वापरावरील बंदी पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवली. एनसीएलटीच्या बंगळुरू खंडपीठाने गुंतवणूकदारांसह कंपनी व्यवस्थापनाची बाजू ऐकून घेतली आणि प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 6 जूनची तारीख निश्चित केली. 

Web Title: Byju changed strategy; Course fee reduced, salary of employees also changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.