Lokmat Money >गुंतवणूक > आणखी एक मोठी कंपनी गुजरातच्या झोळीत, अमेरिकन कंपनी उभारणार मोठा प्लांट

आणखी एक मोठी कंपनी गुजरातच्या झोळीत, अमेरिकन कंपनी उभारणार मोठा प्लांट

अमेरिकन चिम मेकर कंपनी मायक्रॉनला गुजरातमध्ये प्लांट उभारण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 06:41 PM2023-06-21T18:41:56+5:302023-06-21T18:42:17+5:30

अमेरिकन चिम मेकर कंपनी मायक्रॉनला गुजरातमध्ये प्लांट उभारण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.

cabinet approves rs 2.7 billion micron chip testing plant ahead of pm modi's us visit | आणखी एक मोठी कंपनी गुजरातच्या झोळीत, अमेरिकन कंपनी उभारणार मोठा प्लांट

आणखी एक मोठी कंपनी गुजरातच्या झोळीत, अमेरिकन कंपनी उभारणार मोठा प्लांट


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा सध्या चर्चेत आहे. यादरम्यान, एक मोठी माहिती समोर आली आहे. अलीकडेच अमेरिकेतील दिग्गज चिम मेकर कंपनी मायक्रॉनने भारतात $2.7 अब्जाची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आता भारत सरकारने या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. म्हणजेच, आता देशात सेमीकंडक्टर चाचणी आणि पॅकेजिंगचा मोठा प्लांट सुरू होईल.

मायक्रॉन ही अमेरिकेतील मोठी सेमीकंडक्टर चिप बनवणारी कंपनी आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने भारतात गुंतवणुकीची घोषणा केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रॉनचा हा मेगा प्लांट गुजरातमध्ये उभारला जाणार आहे. पीएम मोदींच्या अमेरीका दौऱ्यापूर्वीच कॅबिनेटने या प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून 5,000 नोकऱ्या निर्माण होणार आहेत. 

मायक्रॉन काँप्यूटर मेमरी उत्पादने, फ्लॅश ड्राइव्ह इत्यादी प्रोडक्ट बनवते. कंपनी भारतात एक ओएसएटी (आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंबली अँड टेस्ट) प्लांट उभारणार आहे. या प्लांटमध्ये उत्पादनाची चाचणी आणि पॅकेजिंग केली जाईल. पहिल्या टप्प्यात सरकारने चार OSAT प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये टाटा समूह, सहस्र सेमीकंडक्टर यांच्या प्रस्तावांचा समावेश आहे.
 

Web Title: cabinet approves rs 2.7 billion micron chip testing plant ahead of pm modi's us visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.